लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात (एसआयडी) कार्यरत असलेल्या ३२ गुप्तवार्ता अधिकाऱ्यांना वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी म्हणून बढती देण्यात आली आहे. विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी त्याबाबतचे आदेश नुकतेच बजविले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांपैकी काहींनी पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये (मॅट) धाव घेतली होती. त्याबाबत त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसआयडीने सेवाज्येष्ठतेननुसार ३२ अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश जारी केले. संबंधितांना आवश्यकतेनुसार राज्यातील विविध घटकांमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांना तातडीने संबंधित ठिकाणी रुजू होण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे पुन्हा थैमान वाढत असताना मुंबईबाहेर पदोन्नतीवर बदली झाल्याने अनेकजण नाराज आहेत. राज्यभर ग्रामीण भागात पाठविण्यात आल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.