राज्यातील ६१९ अंमलदारांना पीएसआयपदी पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:17+5:302021-06-02T04:06:17+5:30
२०१३ उपनिरीक्षक अर्हता परीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आठ वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अर्हता परीक्षा दिलेल्या राज्यातील ६१९ ...
२०१३ उपनिरीक्षक अर्हता परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आठ वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अर्हता परीक्षा दिलेल्या राज्यातील ६१९ अंमलदारांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. पोलीस मुख्यालयातून त्यांच्या उपनिरीक्षक पदाच्या बढतीचे आदेश जारी सोमवारी करण्यात आले आहेत. मुंबई महानगरातील सुमारे ३२५ वर जणांचा त्यामध्ये समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले.
२०१३ साली झालेल्या या परीक्षा या त्यातील निकष आणि उमेदवाराच्या दावे-प्रतिदाव्यामुळे सातत्याने चर्चेत राहिली होती. अखेर, पात्र उमेदवारांना न्यायालयाच्या आदेशानुसार सेवाज्येष्ठतेनुसार बढती दिली जात आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यातील १०६१ अंमलदाराना उपनिरीक्षकपदी बढती दिली होती.
अनेक पोलीस सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून ३, ४ वर्षे शिल्लक आहेत. तसेच अनेकांना मधुमेह, रक्तदाब आदी विकार आहेत. त्यामुळे त्यांना सध्या कार्यरत असलेल्या पोलीस घटकांमध्ये नियुक्ती देण्याची सूचना करण्यात आली आहे.
* अन् ते ठरले औट घटकेचे पीएसआय!
बढती देण्यात आलेल्या ६१९ जणांपैकी सुमारे ५० वर अंमलदारांना अवघ्या काही तासांसाठी अधिकारी बनता आले. जुन्या काळातील अनेकांची जन्मतारीख १ जून असल्याने ५८ वर्षे पूर्ण झालेले ३१ मे रोजी सेवानिवृत्त होतात. अखेरच्या दिवशी बढतीचा आदेश जारी केल्याने अखेरचा दिवस असल्याने अनेकांना तातडीने उपनिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली. किमान अधिकारी म्हणून निवृत्त होण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली.
.............................................