निवडणुकीआधीच विकासकामांची जाहिरातबाजी
By Admin | Published: December 27, 2015 01:25 AM2015-12-27T01:25:09+5:302015-12-27T01:25:09+5:30
आगामी महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच नगरसेवकांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे़ यासाठी आपल्या कामाचे वजन पाडण्याची धावपळही अनेकांमध्ये सुरू
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच नगरसेवकांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे़ यासाठी आपल्या कामाचे वजन पाडण्याची धावपळही अनेकांमध्ये सुरू झाली आहे़ यातूनच विकासकामांचे फलक प्रभागामध्ये लावण्याची मागणी पुढे आली आहे़
२०१७ मध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. गेल्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते साफ झाले होते़ आरक्षणाच्या कात्रीतून सुटलो तर आपले तिकीट पक्के करण्यासाठी नगरसेवकांमध्ये आतापासून धावपळ सुरू झाली आहे़ त्यामुळे आपल्या कामाची छाप मतदारांबरोबरच पक्षावरही पाडण्यासाठी नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत़
निवडणुकीचे बिगूल वाजताच विकासकामांचे बार उडविण्याची धावपळ नगरसेवकांमध्ये सुरू होते़ नाक्यानाक्यावर अशा कार्यक्रमांचे नारळ वाढविले जातात़ एवढ्यावरच समाधान होत नसल्याने आता प्रभाग समित्यांमध्ये विकासकामांचे
फलक लावण्याची मागणी शिवसेनेकडून पुढे आली आहे़ यावर आयुक्त कोणती भूमिका घेणार याकडे नगरसेवकांचे लक्ष वेधले
आहे़ (प्रतिनिधी)