आयपीएस संजय पांडे यांना महासंचालकपदाचे पदोन्नती द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 11:50 PM2017-12-07T23:50:20+5:302017-12-07T23:50:32+5:30
मुंबई : राज्य पोलीस दलात भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) ज्येष्ठ असूनही पूर्वीचा आदेश रद्द करून अप्पर महासंचालक संजय पांडे यांना पदावन्नत केल्याबाबत राज्य सरकारला फटकार लावित त्यांना महासंचालक पदी बढती द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.
- जमीर काझी,
मुंबई : राज्य पोलीस दलात भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) ज्येष्ठ असूनही पूर्वीचा आदेश रद्द करून अप्पर महासंचालक संजय पांडे यांना पदावन्नत केल्याबाबत राज्य सरकारला फटकार लावित त्यांना महासंचालक पदी बढती द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. त्यांची दोन वर्षं आठ महिन्याचा सेवा कालावधी असाधारण रजा ( डायस नॉन) नियमित करीत अप्पर महासंचालक म्हणून २०१२ पासून ग्रहित धरण्याची सूचना केली आहे. त्यासाठी सहा आठवड्याची मुदत दिली आहे.
हंगामी मुख्य न्यायाधीश न्या. विजया ताहिलरमाणी व न्या.एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दिलेल्या या आदेशामुळे गृह विभागाची मोठी नाच्चकी झाली आहे. या आदेशामुळे पांडे यांची आता ‘सिनॅरिटी’ आता महाराष्ट्र सुरक्षा मंडळांचे संचालक संजय बर्वे यांच्यावर ठरणार आहे. तत्कालीन राज्य सरकारने दहा वर्षांपूर्वी गृहित धरलेला १४ वर्षापूर्वीचा गैर हजर असलेला सेवा कालावधी या सरकारने रद्द करीत २९ आॅक्टोंबर २०१६ मध्ये रद्द करीत २ वर्षे ८ महिन्याचा कालावधी ‘असाधारण रजा ’केला होता. पांडे यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अॅड. नवरोज सिरवई व अॅड. रणवीर सिंह यांनी त्यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली.
१९८६ च्या बॅचचे आयपीएस असलेल्या संजय पांडे यांनी १२ एप्रिल २००० तत्कालीन राज्यकर्त्यांशी मतभेद झाल्याने राजीनामा देत परदेशात खासगी नोकरी पत्करली होती. मात्र सरकारने राजीनामा मंजूर न केल्याने पांडे यांनी तो पुन्हा मागे घेत १ जुलै २००२ मध्ये पुन्हा हजर होण्याची इच्छा दर्शविली. त्याबाबत केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण (कॅट) व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे राज्य सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची २०००७ मध्ये १२ एप्रिल २००० ते ३० जून २००२ हा कालावधी सेवेत ग्रहित धरला होता. मात्र या सरकारने पुन्हा त्याबाबत बदल करीत ती ‘असाधारण रजा’ठरविली होती. न्यायालयातील सुनावणीमध्ये सरकारने त्याबाबत ९ वेळा वेगवेगळी कारणे दिली. खंडपीठाने ती अयोग्य ठरवित पांडे यांना सहका-यांबरोबरच म्हणजे २० जून २०१२ पासून अप्पर महासंचालक पदाची सेवा जेष्ठता द्यावी आणि त्याचप्रमाणेच महासंचालक पदाची पदोन्नती देण्याचे आदेश दिले आहे.
--------
आयपीएसच्या १९८६ च्या बॅचमध्ये ‘एफएसएल’चे महासंचालक एस.पी.यादव, व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक संजय बर्वे आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे पांडे यांची ‘सिनॅरिटी’ आता बर्वे यांच्यावर होईल. त्याचप्रमाणे सध्या महासंचालक पदासाठी तीन महिन्यापासून पात्र ठरविलेल्या अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांचा क्रम बर्वे यांच्यानंतर राहणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणा-या अतिवरिष्ठ अधिका-यांच्या बदल्याची समिकरणे बदलणार आहेत.