मुंबई : विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी पालिका शाळांच्या मैदानांचा विकास करण्यात येणार आहे. याचा पहिला प्रयोग पश्चिम उपनगरातील तीन शाळांमध्ये करण्यात येणार आहे. या शाळांच्या मैदानावर कबड्डी, खोखो, हॅण्डबॉल, बास्केट बॉल या खेळांसाठी पीच तयार करण्यात येणार आहे.पालिका शाळांमध्ये मोठे मैदान असले तरी त्याचा वापर लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी होत होता. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्राची ओढ असली तरी परिस्थितीअभावी अनेकांना आवड जोपासण्याची, करिअर करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळावे, यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिकेच्या सात शाळांंमध्ये खेळाच्या मैदानाचा विकास करण्याचे निश्चित केले आहे. त्यापैकी शिक्षणाधिकाºयांनी पश्चिम उपनगरातील तीन शाळांची निवड केली आहे. या शाळांच्या मैदानांचा विकास करण्यात येणार आहे.अशी आहेत विकासाची कामे : मैदानांमध्ये खेळणी बसवणे, पीच तयार करण्यापूर्वी मूलभूत सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. यात आवश्यकतेनुसार मैदानात खोदकाम करणे, पावसाळी पाण्याच्या निचºयासाठी मैदानाभोवती नालीचे बांधकाम करणे, नालीवर संरक्षक जाळी बसवणे, मैदानातील पाणी झिरपण्याकरिता परफोरेटेड पाइप बसवणे, मैदानाकरिता दगडी थराची भरणी करणे, त्यावर मातीची भरणी करून मातीचे मैदान बसवणे, खेळाचे साहित्य, रबरी मॅट बसवणे, आवश्यक विद्युत रोषणाई करणे ही कामे केली जाणार आहेत.या तीन शाळांमध्ये प्रयोगबजाज रोड पालिका शाळा, बोरीवली येथे कबड्डी, खो-खो, हॅण्डबॉलसाठी मैदानकुरार हिंदी मनपा शाळा, कांदिवली येथे खो-खो, कबड्डी, हॅण्डबॉल, बास्केटबॉलची व्यवस्थाशास्त्रीनगर पालिका शाळा, वांद्रे पूर्व येथे फुटबॉल, कबड्डी व खोखोसाठी प्रयत्न
महापालिका शाळांमध्ये कबड्डी, ‘खो-खो’ला प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:53 AM