प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By admin | Published: October 13, 2014 10:41 PM2014-10-13T22:41:22+5:302014-10-13T22:41:22+5:30

जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदारसंघात आजच्या निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी गावांगावांत रॅली काढून आपल्या मतदारांना अखेरचे जाहीर आवाहन केले.

Promotional guns stopped | प्रचाराच्या तोफा थंडावल्या

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Next
अलिबाग : जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदारसंघात आजच्या निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी गावांगावांत रॅली काढून आपल्या मतदारांना अखेरचे जाहीर आवाहन केले. भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेकरिता सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तर काँग्रेसकरिता राहुल गांधी यांच्या जाहीर सभांनी जिल्हय़ात वातावरण तापले, मात्र त्या व्यतिरिक्त अन्य राजकीय पक्षांच्या जाहीर सभांमध्ये प्रचाराच्या तोफा दणाणल्याच नाहीत. जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. 
संभाव्य ‘सुप्त अर्थपूर्ण’ प्रचाराच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक यंत्रणोतील भरारी पथके आणि पोलीस यंत्रणा आज संध्याकाळपासूनच कामाला लागली आहे.  सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यालयात आज संध्याकाळी आजची रात्र, मंगळवार दिवस-रात्र आणि बुधवारच्या मतदानाच्या अनुषंगाने बैठका घेवून नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान निवडणूक व पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून जिल्हा निवडणूक यंत्नणा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
19 लाख 88  हजार मतदार 
जिल्हय़ातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदारसंघात निवडणुका होत असून जिल्ह्यात एकूण 1क् लाख 18 हजार क्क्1 पुरु ष मतदार असून 9 लाख 7क्  हजार 5क्क् स्त्नी मतदार असे एकूण 19 लाख 88  हजार 5क्1 मतदार आहेत. त्याचप्रमाणो 158क् पुरूष तर 568 महिला असे एकूण 2148 सैनिक मतदार आहेत. जिल्हय़ात एकूण 2366 मूळ मतदान केंद्रे असून 122 सहाय्यकारी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. परिणामी आता एकूण 2488 मतदान केंद्रे असतील. या मतदान केंद्रांपैकी 42 मतदान केंद्रे ही संवेदनशील मतदान केंद्रे आहे.
88 उमेदवार निवडणूक रिंगणात
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण 88 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी  निवडणूक विभागामार्फत 2 हजार 488 मतदान केंद्रावर 12 हजार 1क्5 अधिकारी व कर्मचा:यांची नियुक्ती केली आहे. तसेच वाहतुकीसाठी 291 बसेस, 71 मिनीबस,544 जीप अशी एकूण 9क्6 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
सात मतमोजणी केंद्रेही सज्ज
जिल्ह्यात पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी अब्दुल रझाक काळसेकर कॉलेज (पॉलिटेक्निक), धाकटा खांदा, पनवेल ता.पनवेल जि.रायगड, कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेज, पारडे, दहीवली त. निड, ता.कर्जत, उरण विधानसभा मतदारसंघासाठी रिक्रऐशन क्लब, गॅस टरबाईन पॉवर स्टेशन कॉलनी, बोकडवीरा, ता.उरण, पेण विधानसभा मतदारसंघासाठी के.ई.एस.लिटल एंजल इंग्लिश स्कूल, मुंबई-गोवा हायवे, पेण. , अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, ता.अलिबाग, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी सेंट्रल अॅ़डमिनीस्ट्रेटीव्ह बिल्डिंग, श्रीवर्धन,  महाड विधानसभा मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड, ता.महाड, अशी 7 मतमोजणी केंद्रे राहणार आहेत. 
चोख कायदा व सुव्यवस्था 
जिल्हय़ातील विधानसभा मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हय़ासाठी एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, 11 पोलीस उपअधीक्षक, 31 पोलीस निरीक्षक, 159 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 1945 पोलीस कर्मचारी, सी.आर.पी.एफ. च्या दोन तुकडय़ा, एस.आर.पी.एफ. च्या चार तुकडय़ा तसेच 52क् होमगार्ड तैनात आहेत. प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा एक भाग म्हणून निवडणुकीच्या कालवधीमध्ये जिल्ह्यातील 27 पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्नातील 1439 शस्त्ने जमा केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
1दासगाव : 194 - महाड विधानसभा मतदारसंघात होणा:या मतदानाकरिता निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. 13 व्या विधानसभेसाठी महाड मतदार संघामध्ये 386 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याकरिता पोलिसांची फौज आणि निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती निवडणूक माहिती अधिकारी कलशेट्टी यांनी दिली.
2महाडसह पोलादपूर आणि माणगावमध्ये दोन दिवसांपूर्वी पोलीस आणि एसआरपीचा लाँगमार्चही काढण्यात आला, तसेच निवडणूक निर्णय अधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान यंत्रंचीही तपासणी करण्यात आली. 
 
3महाड विधानसभा मतदारसंघात 386 मतदान केंद्रे असून यातील अनेक केंद्रे ही दुर्गम ठिकाणी आहेत. त्यासाठी खास वाहनांची सुविधा करण्यात आली आहे. खाजगी आणि एस टी महामंडळाच्या बसने मतदान यंत्रणोची ये-जा होईल.
 
4मतदान यंत्रत काही बिघाड झाल्यास याव्यतिरिक्त 2क् टक्के यंत्रे जादा ठेवण्यात आली आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचेही कलशेट्टी यांनी सांगून याठिकाणी पोलीस कर्मचा:यांबरोबर एस.आर.पी., पी.आर.पी. आणि ए.एस.पी. चे जवान देण्यात आले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघ हा कायम शांतता राखणारा मतदारसंघ आहे, असे असले तरी निवडणूक विभागाने सर्व खबरदारी घेतली आहे.

 

Web Title: Promotional guns stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.