पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदल्यांसाठी तारीख पे तारीख!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 02:46 AM2020-08-10T02:46:14+5:302020-08-10T06:56:36+5:30

नियुक्तीबाबत महाआघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद; पोलीस वर्तुळात अस्वस्थता

promotions and transfers of police officers pending | पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदल्यांसाठी तारीख पे तारीख!

पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदल्यांसाठी तारीख पे तारीख!

Next

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे लांबलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. कोणाला कोठे आयुक्त करायचे, अधीक्षक नेमायचे, याबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता होत नाही. त्यामुळे त्याबाबत ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आयपीएस ते उपनिरीक्षक दर्जाच्या सर्वसाधारण व विशेष बदल्यांबाबत तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमताने निर्णय होत नसल्याने तब्बल तीन वेळा मुदत वाढवून घेण्यात आली आहे. आता १५ ऑगस्ट ही डेडलाइन ठरविण्यात आली आहे. मात्र तोपर्यंतही एकवाक्यता न झाल्यास आणखी मुदत वाढवून घेण्यात येईल, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

मार्च महिन्याच्या मध्यानंतर कोविड-१९ विषाणूची दाहकता सरकारच्या लक्षात आल्याने काटकसरीचे धोरण म्हणून या वर्षीच्या सर्वसाधारण बदल्या रद्द करण्याचे ठरले. मात्र गृह, महसूलसह अनेक विभागांत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाºयांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ते त्याच ठिकाणी कायम राहिल्यास त्याचा मोठा परिणाम होईल. त्या जागेवर नियुक्तीसाठी इच्छुक अधिकाºयांत नाराजी पसरली आहे, ही बाब राज्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने विशेष बाब म्हणून ३१ जुलैपर्यंत सरासरी १५ टक्के अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्या करण्याला सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली. त्यानुसार गृह विभाग वगळता बहुतांश सर्व विभागांच्या बदल्या निर्धारित मुदतीत केल्या.

मात्र पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांच्या धोरणाबाबत डीजी ऑफिस आणि गृह विभाग तसेच सत्तेत सहभागी असलेले शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एकमत होऊ शकले नाही. गृहखाते राष्ट्रवादीकडे असले तरी काही ठिकाणचे आयुक्त, अधीक्षकांच्या नियुक्तीसाठी अन्य दोन्ही पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे तिढा न सुटल्याने बदल्यांसाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली. मात्र या कालावधीतही नेत्यांकडून ठोस निर्णय न झाल्याने त्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ घेण्यात आली आहे.

या ठिकाणच्या होणार बदल्या
अतिवरिष्ठ पदामध्ये ठाणे, पुणे, नवी मुंबई, नागपूर, एसआयडी, एटीएसचे आयुक्त तसेच अनेक जिल्हाप्रमुख बदलले जातील, असे गृह विभागातून सांगण्यात येते. मात्र एखादेवेळी ठाणे व एटीएसला त्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अप्पर महासंचालक म्हणून बढती झालेल्या विनयकुमार चौबे, आयजी अमितेशकुमार, नवल बजाज, प्रवीण साळुंखे यांचे प्रमोशन असून दहावर उपायुक्त, अधीक्षक दर्जाच्या अधिकाºयांना बढती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महत्त्वाची रिक्त पदे व वेटिंगवरील अधिकारी
पोलीस दलातील अनेक महत्त्वाची व जबाबदारीची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत, त्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे (क्राइम) सहआयुक्त व नागपूरच्या नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक आणि वैधमापन शास्त्र विभागातील अप्पर महासंचालक दर्जाच्या नियंत्रकाचा समावेश आहे. तर केंद्रातून प्रतिनियुक्तीहून परतलेल्या अप्पर महासंचालक सदानंद दाते, विशेष महानिरीक्षक निखिल गुप्ता तसेच ब्रिजेश सिंग हे प्रतिनियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: promotions and transfers of police officers pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस