‘पुराव्याचा कायदा’ निकाली, विद्यापीठाकडून फेरतपासणीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 04:07 AM2017-09-15T04:07:09+5:302017-09-15T04:07:24+5:30
विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात लॉ अभ्यासक्रमात ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या चुकीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार फेरतपासणीचे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे एलएलएमसाठी प्रोव्हिजनल प्रवेश शक्य होणर आहेत. त्यानुसार एलएलएम अभ्यासक्रमासाठी सीईटी पात्र असलेले, मात्र एकाच विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आता एलएलएमसाठी ‘प्रोव्हिजन’ (तात्पुरता) प्रवेश देण्यात येणार आहे.
मुंबई : विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात लॉ अभ्यासक्रमात ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या चुकीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार फेरतपासणीचे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे एलएलएमसाठी प्रोव्हिजनल प्रवेश शक्य होणर आहेत. त्यानुसार एलएलएम अभ्यासक्रमासाठी सीईटी पात्र असलेले, मात्र एकाच विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आता एलएलएमसाठी ‘प्रोव्हिजन’ (तात्पुरता) प्रवेश देण्यात येणार आहे. यानंतर फेरतपासणीत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होतील.
गेल्या परीक्षेतील टॉपर्स असलेले विद्यार्थी पुराव्याचा कायदा विषयात नापास झाले आहेत. याची दखल घेत विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे पाठपुरावा करून या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी व तोपर्यंत एलएलएम सीईटीपात्र विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश द्यावा अशी मागणी केली होती. पदव्युत्तर प्रवेशांना मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.