उत्पन्नाचा दाखला, अनुदान घेऊन शासन आपल्या दारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 09:37 AM2023-05-26T09:37:06+5:302023-05-26T09:37:17+5:30

मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातसुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला आहे.

Proof of income, government at your door with subsidy! | उत्पन्नाचा दाखला, अनुदान घेऊन शासन आपल्या दारी!

उत्पन्नाचा दाखला, अनुदान घेऊन शासन आपल्या दारी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जात आहे. येत्या १५ जूनपर्यंत किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातसुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला आहे.

काय आहे शासन आपल्या दारी योजना? 
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे.  एकाच ठिकाणी एका छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत अशा रीतीने योजना करण्यात आली आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आता महालाभार्थी पोर्टलमधून नागरिक स्वत: किंवा प्राधिकृत केंद्रावर माहिती भरूनसुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकतात.

किमान ७५ हजार जणांना होणार लाभ 
एका जिल्ह्यात साधारणपणे ७५ हजार ते १ लाख नागरिकांची नोंदणी एक महिन्याच्या कालावधीत करण्यासाठी ४० ते ५० केंद्रे प्राधिकृत करण्यात आली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे.

कशाकशाचा मिळणार लाभ? 
या अभियानाचा मुख्य उद्देश हा सरकारच्या योजना, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हाच आहे. सरकारी निर्धारित शुल्कात २०० हून अधिक योजनांचा लाभ कमीतकमी कागदपत्रे सादर करून जलद मंजुरी मिळणार आहे. प्रशासन ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून प्रत्येकाला या योजनेची माहिती देणार आहे.

१५ जूनपर्यंत राबविणार अभियान 
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना लाभ दिला जात आहे. येत्या १५ जूनपर्यंत हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविली जाणार आहे.

Web Title: Proof of income, government at your door with subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.