ग्रामीण, नक्षली भागात टेनिसचा प्रसार

By admin | Published: July 30, 2014 01:11 AM2014-07-30T01:11:48+5:302014-07-30T01:11:48+5:30

ग्रामीण आणि नक्षली प्रभावित भागात टेनिसची पाळेमुळे रुजवण्यात महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) प्रयत्नांना यश आले आहे.

The propagation of tennis in rural, naxal areas | ग्रामीण, नक्षली भागात टेनिसचा प्रसार

ग्रामीण, नक्षली भागात टेनिसचा प्रसार

Next
मुंबई : ग्रामीण आणि नक्षली प्रभावित भागात टेनिसची पाळेमुळे रुजवण्यात महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) प्रयत्नांना यश आले आहे. या प्रय}ांतर्गत संघटनेने 22 उदयोन्मुख खेळाडूंना केवळ प्रशिक्षण दिले  नसून त्यांना इतरांनाही प्रशिक्षण देण्यासाठी तयार केले आहे. ग्रामीण भागातील युवक  टेनिसकडे वळावा हा कौशल्य विकास ग्रामीण टेनिस कार्यक्रमांचा मूळ उद्देश होता. या माध्यमातून या युवकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रय} असल्याचे एमएसएलटीएचे अधिकारी सुंदर अय्यर यांनी सांगितले. 
यातील काही युवकांची निवड एटीसीमार्फत करण्यात आली असून, त्यात चार मुलींचा समावेश आहे. निवड झालेले खेळाडू विदर्भाच्या सहा तालुक्यांतील आहेत. त्यांना अखिल भारतीय टेनिस संघटनेचे प्रशिक्षक अजरुन सुतार आणि कपिल 
चुटेळे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे. 
एमएसएलटीएकडून या खेळाडूंना टेनिस किट, तांत्रिक साहाय्य मिळत आहे. तसेच एटीसीकडून या खेळाडूंच्या राहण्याची व खाण्याची सोयही करण्यात येत असल्याचे अय्यर यांनी स्पष्ट केले. हा उपक्रम एमएसएलटीएचे खजिनदार अय्यर, आयटीएफ लेवलचे तीन टय़ुटर हेमंत बेंद्रे, मनोज वैद्य, एमएसएलटीएचे सदस्य प्रशांत सुतार आणि नागपूरच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या प्रय}ांचे यश म्हणावे लागेल. (क्रीडा प्रतिनिधी) 
 
मुलांना कळावे म्हणून..
या उपक्रमाचे यश म्हणजे उमेश गेदाम. चंद्रपूर जिल्ह्यातील उमेश हा त्या 22 प्रशिक्षित युवकांपैकी एक. त्याला आता पुणो, हैदराबाद, नागपूर येथून नोकरीची संधी चालून आली आहे. आम्ही या मुलांना सर्व गोष्टी मराठीत समजावतो. त्यांच्यासाठी टेनिसची नियमपुस्तिकाही मराठीत तयार करण्यात आल्याचे अय्यर यांनी सांगितले. 

 

Web Title: The propagation of tennis in rural, naxal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.