प्रमुख स्थानकांवर रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त; प्रवासी सुरक्षेसाठी सहा हजार जवान तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 05:33 AM2022-12-31T05:33:24+5:302022-12-31T05:34:19+5:30
रेल्वे प्रवासादरम्यान अडचण, आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी येथे करा संपर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :नववर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता लोहमार्ग पोलिसांकडून शहरातील प्रमुख स्थानकांवर सहा हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुंबई रेल्वेचे कार्यक्षेत्रात दोन पोलिस उपआयुक्त,चार सहायक पोलिस आयुक्त,११४ पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार, होमगार्ड, एमएसएफ असा सुमारे ६ हजार अंमलदार यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच रेल्वे टर्मिनस, गर्दीची रेल्वे स्थानके,अडगळीची ठिकाण येथे मुंबई रेल्वे पोलिसांचे श्वानपथक व बॉम्बशोधक पथक यांचेकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.
मदतीसाठी येथे करा संपर्क
रेल्वे प्रवासादरम्यान अडचण, आणीबाणीच्या प्रसंगी मुंबई रेल्वे पोलिसांची त्वरित मदत मिळावी याकरिता प्रवाशांसाठी रेल्वे पोलिस नियंत्रण कक्ष, हेल्पलाइन नंबर,व्हॉट्सॲप क्रमांक २४*७ कार्यान्वित आहेत. नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२२३७५९२०१, २३७५९२८३ हेल्पलाइन क्रमांक १५१२ तर व्हाॅट्सॲप क्रमांक - ९५९४८९९९९१,८४२५०९९९९१.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"