छगन भुजबळांची संपत्ती पाहून डोळे फिरतील; ही बघा ACBनं दिलेली यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 04:56 PM2018-05-04T16:56:02+5:302018-05-04T16:56:02+5:30
डोळे विस्फारुन टाकणारी भुजबळांची संपत्ती
मुंबईः दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी छगन भुजबळांची चौकशी सुरू झाल्यावर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. हे छापासत्र सुरू झाल्यावर भुजबळांची संपत्ती आणि मालमत्ता यांची माहिती समोर येऊ लागली. भुजबळांच्या संपत्तीचा आकडा अनेकांचे डोळे विस्फारुन टाकणारा होता. याशिवाय मोक्याच्या जागेवरील मालमत्ता, महागड्या गाड्या, मोठमोठाले फ्लॅट्स यांचा आकडादेखील आश्चर्यजनक आहे.
मुंबई
निवासस्थान मालक मालमत्ता
सुखदा को.ऑ.हौ.सो. वरळी छगन भुजबळ २००० चौ.फुटांचे घर, टोयोटा कॅमरी कार
मिलेशिया अपार्टमेंट, माझगाव छगन भुजबळ ६०० चौ.फुटांची तीन घरे
माणेक महल, ५वा मजला पंकज भुजबळ १२०० चौ. फुटांचे घर
माणेक महल, ७वा मजला मिना छ. भुजबळ १२०० फुटांचे घर (भाड्याने दिलेले)
सागर मंदिर को.ऑ.हौ.सो., हिराबाई मगन भुजबळ ६०० चौ. शिवाजी पार्क फुटांचे घर
साईकुंज बिल्डिंग, दादर (पू.) विशाखा भुजबळ १५०० चौ. फु. घर, शेफाली भुजबळ (१२०० चौ. फू.), हिराबाई भुजबळ (१५०० चौ.फू.), मिना भुजबळ (१२०० चौ.फू.),
ग्रोथ इन्फ्रा, दुकान (१५०० चौ.फू.)
सॉलिटेअर बिल्डिंग, समीर भुजबळ संपूर्ण पाचवा माळा, एस.व्ही. रोड, सांताक्रूझ २५०० चौ.फू.घर
पंकज भुजबळ सातवा माळा, २५०० चौ.फू. घर
मिना भुजबळ आठवा मजला २५०० चौ.फू. घर
ठाणे
पी एच ७, मारुती पंकज भुजबळ १३५० चौ.फू. घर, एनक्लेव्ह को. ऑ. सो. तसेच ए विंगमध्ये भुजबळ ग्रुप कंपनीचे एक घर
मारुती पॅराडाइज को.ऑ.हौ. दुर्गा भुजबळ १३०५ चौ.फू.घर
सो.बी-विंग. सीबीडी बेलापूर
मारुती पॅराडाइज को.ऑ. हौ. भुजबळ ग्रुप एकूण नऊ गाळे, सी-विंग. सीबीडी बेलापूर त्यातील दोन भाड्याने तर सात बंद.
एव्हरेस्ट को.ऑ.हौ. पंकज भुजबळ १३०० चौ.फू.घर
सोसायटी सीबीडी बेलापूर
लाजवंती बंगला, मिना भुजबळ १३०० चौ.फू. घर
सीबीडी बेलापूर
नाशिक
चंद्राई बंगला, भुजबळ फार्म मिना भुजबळ ४००० चौ.फू. बंगला
भुजबळ पॅलेस, भुजबळ पंकज भुजबळ ४६५०० चौ.फू. बंगला. किंमत अंदाजे १०० कोटी. २५ खोल्या, स्विमिंग पूल व जीम.
येवला पंकज भुजबळ ५००० चौ.फू. ११ खोल्या
नमाड येथे बंगला, ऑफिस ३००० चौ.फू., पाच खोल्या
राम बंगला समीर भुजबळ १५०० चौ.फू.
पुणे
लोणावळा, मु.पो. आवतन पंकज भुजबळ, २.८२ हेक्टरजागेत समीर भुजबळ सहा बेडरूमचा अलिशान बंगला, परदेशी फर्निचर, प्राचीन मूर्ती, स्विमिंग पूल, हेलिपॅड, शेततळे, तीन नोकरांची घरे, सुरक्षा रक्षकांकरिता पाच खोल्या, अंदाजे पाच कोटी किमतींची फळझाडांची लागवड.
ग्राफीकॉन आर्केड, समीर भुजबळ घर
संगमवाडी फ्लॅट नं. २०८,
तिसरा माळा, प्लॉट नं. १५३,