मुंबई शहरातील प्रॉपर्टी कार्ड आता मोबाईल ॲपवरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:06 AM2021-03-19T04:06:54+5:302021-03-19T04:06:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका ''प्रॉपर्टी कार्ड'' आणि भू-कर ...

Property cards in Mumbai are now available on mobile apps | मुंबई शहरातील प्रॉपर्टी कार्ड आता मोबाईल ॲपवरही

मुंबई शहरातील प्रॉपर्टी कार्ड आता मोबाईल ॲपवरही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका ''प्रॉपर्टी कार्ड'' आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड हे ॲप नागरिकांसाठी विकसित केले असून, या ॲपचे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी गुरूवारी लोकार्पण केले.

या ॲपची सुविधा मुंबई शहर जिल्ह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी ॲप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सीटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल. हे ॲप अतिशय चांगले असून, सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या या ॲपचा नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या mumbaicity.gov.in व prcmumbai.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इज ऑफ ड्युईंग बिझनेस उपक्रमांतर्गत मुंबई शहर एनआयसीने ‘ई-प्रॉपर्टी कार्ड’ या ॲपची निर्मिती केली असून, यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कविता पाटील आणि अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी अनिल राठोड यांनी हे ॲप विकसित केले आहे.

Web Title: Property cards in Mumbai are now available on mobile apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.