मोठ्या विकासकांच्या मालमत्ता सील, ४५ कोटींचा मालमत्ता कर थकविला, ११ भूखंडांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:02 AM2018-03-21T00:02:51+5:302018-03-21T00:02:51+5:30

गेली अनेक वर्षे महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या बड्या विकासकांवरही अखेर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये एचडीआयएल, डी. बी. रिअ‍ॅलिटी, आकृती डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आदींचा समावेश आहे. करोडो रुपयांचा मालमत्ता कर थकविणा-या या मोठ्या विकासकांचे कार्यालय, भूखंड सील करण्यात आले आहेत.

Property seals of big developers, tax exemption of 45 crores, action on 11 plots | मोठ्या विकासकांच्या मालमत्ता सील, ४५ कोटींचा मालमत्ता कर थकविला, ११ भूखंडांवर कारवाई

मोठ्या विकासकांच्या मालमत्ता सील, ४५ कोटींचा मालमत्ता कर थकविला, ११ भूखंडांवर कारवाई

Next

मुंबई : गेली अनेक वर्षे महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या बड्या विकासकांवरही अखेर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये एचडीआयएल, डी. बी. रिअ‍ॅलिटी, आकृती डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आदींचा समावेश आहे. करोडो रुपयांचा मालमत्ता कर थकविणा-या या मोठ्या विकासकांचे कार्यालय, भूखंड सील करण्यात आले आहेत. गेल्या पंधरवड्यात शंभर कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणा-या ३१ मोठ्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
मुंबईतील ११ मालमत्ता आज सील करण्यात आल्या. यामध्ये मे. एचडीआयएल, एफ उत्तर विभागातील मे. ग्रेस ग्रुप आॅफ कंपनीज, जी दक्षिण विभागातील रिअल जेम बिल्डटेक प्रा. लि. (डी. बी. रिअ‍ॅलिटी), कमला मिल कम्पाउंडमधील ‘ट्रेड विंग’, ना. म. जोशी मार्गावरील श्रीपती इन्व्हेस्टमेंट व रूपाजी कन्स्ट्रक्शन, जी उत्तर विभागातील दीजय डेव्हलपर्स व आकृती डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, एन विभागातील व्हायटल डेव्हलपर्सचा आणि टी विभागातील मुलदीप को-आॅप हाउसिंग सोसायटी या सर्व कंपनीच्या भूखंडांचा समावेश आहे, अशी माहिती करनिर्धारक व संकलक व सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांनी दिली आहे.

हे आहेत मोठे थकबाकीदार
मालमत्ता ... थकबाकी ....सील

- भांडुप पश्चिम दत्त मंदिर मार्गावरील मे. एचडीआयएल यांचा भूखंड - १५ कोटी ७९ लाख रुपये .... सेल्स आॅफिस आणि दोन प्रशासकीय कार्यालये.
- परळ एस. टी. स्टँडजवळील व ना. म. जोशी मार्गावरील ‘रिअल जेम बिल्डटेक प्रा. लि.’ (डी. बी. रिअ‍ॅलिटी) - (१५ कोटी ३३ लाख रुपये) तीन भूखंड सील.
- सेनापती बापट मार्गावरील कमला मिल कम्पाउंडमधील ‘ट्रेडविंग-इविंग’ - पाच कोटी १२ लाख ९९ हजार ३०७ - दोन मुख्य प्रवेशद्वार सील.
- सुमनताई म्हात्रे मार्गावरील मे. ग्रेस ग्रुप आॅफ कंपनी यांच्या मालकीचे भूखंड - दोन कोटी ५२ लाख २४ हजार ५८९ - भूखंड सील.
- ना. म. जोशी मार्गावरील श्रीपती इन्व्हेस्टमेंट या विकासकाच्या अखत्यारितील भूखंड - दोन कोटी ३८ लाख २ हजार ७२६ -भूखंड सील.
- लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सनशाइन डेव्हलपर्स यांच्या मालकीचा भूखंड- दोन कोटी ५ लाख ५१ हजार ९१ - मुख्य प्रवेशद्वार मोहोरबंद करण्यात आले आहे.

- ना. म. जोशी मार्गावरील रूपाजी कन्स्ट्रक्शन - ६३ लाख १५ हजार ४१७ - भूखंड सील.
- ९० फुटी रस्त्यावरील व्हायटल डेव्हलपर्स यांच्या अखत्यारितील भूखंडावर - ५८ लाख ३ हजार ४८७ एवढा थकीत मालमत्ता कर आहे.
- काकासाहेब गाडगीळ मार्गावरील आकृती डेव्हलपर्स अँड बिल्डर्स या विकासकाच्या भूखंडावर ३४ लाख ६५ हजार ६४९.
- (मुलुंड पश्चिम) वालजी लब्धा रोडवरील मुलदीप को-आॅप हाउसिंगमधील बांधकामाखाली असणाºया भूखंडांवर १५ लाख ४६ हजार १३८ एवढा थकीत मालमत्ता कर आहे. थकीत मालमत्ता करापोटी या चारही भूखंडांवर ‘सील’ कारवाई केली.

Web Title: Property seals of big developers, tax exemption of 45 crores, action on 11 plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.