मालमत्ता कराची टांगती तलवार

By admin | Published: March 19, 2015 01:20 AM2015-03-19T01:20:38+5:302015-03-19T01:20:38+5:30

: रेडीरेकनरचे दर वाढल्यामुळे मालमत्ता करामध्ये प्रस्तावित असलेली २७ टक्क्यांची वाढ १४ टक्क्यांवर आणण्यात येणार आहे़

Property tax breaks sword | मालमत्ता कराची टांगती तलवार

मालमत्ता कराची टांगती तलवार

Next

मुंबई : रेडीरेकनरचे दर वाढल्यामुळे मालमत्ता करामध्ये प्रस्तावित असलेली २७ टक्क्यांची वाढ १४ टक्क्यांवर आणण्यात येणार आहे़ हा प्रस्ताव २० मार्चपर्यंत मंजूर न झाल्यास २७ टक्क्यांप्रमाणे १,०९३ कोटींचा बोजा मुंबईकरांवर पडण्याची टांगती तलवार आहे़ त्यामुळे गेले अनेक महिन्यांनी हा प्रस्ताव लांबणीवर टाकणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीची झोप उडाली आहे़ रातोरात हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी युतीने आता गळा काढण्यास सुरुवात केली आहे़
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने कार्पेट क्षेत्रफळावर मालमत्ता कर आकारणीचे सूत्र तयार केले़ पाच वर्षांनंतर मालमत्ता करामध्ये २७ टक्के वाढ प्रस्तावित होती़ आता नवी करवाढ १४ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला़
ही करवाढ १ एप्रिल २०१५ पासून लागू होत असल्याने या प्र्रस्तावाला २० मार्चपर्यंत स्थायी समितीत मंजूर मिळण्याची डेडलाईन आहे़ मात्र शिवसेना-भाजपा युतीच्या वेळकाढू धोरणामुळे २४ तासांतच या प्रस्तावावर निर्णय घेण्याची वेळ स्थायी समितीवर आली आहे़ युतीने हा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर करण्याची तयारी केली होती़ परंतु विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सत्ताधाऱ्यांनी माघार घेतली. (प्रतिनिधी)

लक्ष सहा हजार कोटी
बिल्टअप क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर वसूल केल्यास पालिकेला ५,०७७़ ६२ कोटींचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा होणार होते़ मात्र नवीन सूत्रानुसार कार्पेट क्षेत्रफळाप्रमाणे मालमत्ता कर वसूल होणार असल्याने पालिकेला ४,५६३़ ३३ कोटी उत्पन्न मिळणार आहे़ दरवर्षी सहा हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्याचे लक्ष्य आहे़
मुंबईकरांवर अतिरिक्त बोजा
सुधारित मालमत्ता करानुसार १४़५२ टक्के वाढ म्हणजे ५७८ कोटींचा बोजा मुंबईकरांवर पडणार आहे़ निवासी मालमत्तांसाठी हा कर ११़ ७४ टक्के असणार आहे़ मात्र २७ टक्के एवढी वाढ लागू झाल्यास १०९३ कोटींचा भुर्दंड करदात्यांना
बसणार आहे़

Web Title: Property tax breaks sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.