Join us

मालमत्ता कर कार्पेटनुसारच

By admin | Published: March 17, 2015 1:39 AM

मालमत्ता कर आता बिल्टअपऐवजी कार्पेट एरियानुसारच आकारला जाणार आहे. न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवत पालिका प्रशासनाने २० टक्के जादा कर आकारणीची तयारी चालवली होती.

मुंबई : मालमत्ता कर आता बिल्टअपऐवजी कार्पेट एरियानुसारच आकारला जाणार आहे. न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवत पालिका प्रशासनाने २० टक्के जादा कर आकारणीची तयारी चालवली होती. मात्र सर्वपक्षीय सदस्यांचा विरोध पाहता अखेर प्रशासनाने आज माघार घेतली़ परंतु करदात्यांना हा दिलासा केवळ २०१५-१६ या एका वर्षासाठीच मिळणार आहे़जागेच्या भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आली आहे़ बिल्टअपऐवजी मालमत्ता कर कार्पेट एरियावर घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तथापि, आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण सांगत पालिकेने २० टक्के करवाढीचा प्रस्ताव आणला होता़ ही वाढ कार्पेट एरियावर भरलेल्या स्टॅम्प ड्युटीच्या रेडीरेकनर दरानुसार आकारण्याचे प्रस्तावित होते. त्यात राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाने याविरोधात आवाज उठवला. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आणि मालमत्ता कर आकारणीचे सादरीकरण होईपर्यंत, हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला़ त्यानुसार गटनेत्यांच्या बैठकीत आज यावर सादरीकरण झाले़ (प्रतिनिधी)२० टक्के करवाढीला नगरसेवकांनी विरोध केल्याने पालिकेचे उत्पन्न २९७ कोटींनी घटेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता़ पण आता हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. पर्यायाने वर्षभरात मालमत्ता करातून अपेक्षित २७ कोटींचे उत्पन्न १४ कोटींवर येणार आहे़