मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:06 AM2021-01-21T04:06:58+5:302021-01-21T04:06:58+5:30

करदात्यांना भरावा लागणार केवायसी फॉर्म लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेकडे अवघे दोन ...

Property tax payments will now be available via e-mail | मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार

मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार

Next

करदात्यांना भरावा लागणार केवायसी फॉर्म

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेकडे अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे मालमत्ता कराची देयके लवकरात लवकर पोहोचण्यासाठी ती ई-मेलवर पाठविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी करदात्यांनी पालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी फॉर्ममध्ये आपली आवश्यक माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन पालिकेने केले.

मुंबईत मोठ्या प्रमाणात करदात्यांनी केवायसीची नोंद अद्याप केलेली नाही. केवायसी अद्ययावत केल्यानंतर मालमत्ता करासंबंधीची सूचना ई-मेल आणि एसएमएसद्वारे करदात्यांना पाठविण्यात येतील. ई-मेल आणि एसएमएसमुळे भविष्‍यातील मालमत्ता कराविषयक योजनेची माहिती त्यांना मिळेल. सुधारित देयके त्‍वरित उपलब्‍ध होतील. पालिकेच्‍या देयकांसाठी वापरात असलेल्‍या कागदाचा व त्‍यावरील पोस्टेज, पाकिटे, फ्रँकिंग या बाबींचा खर्च टाळता येईल. या ऑनलाइन सेवेमुळे करदात्यांसह पालिकेच्या वेळेची बचत हाेईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

* १९ हजार ५०० कोटी रुपये थकीत

- मुंबईत सुमारे सव्वाचार लाख मालमत्ता करदाते आहेत. त्यापैकी सव्वा लाख करदात्यांनी केवायसीची नोंदणी केली आहे.

- सन २०२० - २०२१ आर्थिक वर्षात पाच हजार ३०० कोटींपैकी केवळ ९५० कोटी आतापर्यंत जमा झाले आहेत. तर डिसेंबर २०२० पर्यंत एकूण १९ हजार ५०० कोटी रुपये थकीत आहेत.

...............................

Web Title: Property tax payments will now be available via e-mail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.