शेवटच्या दिवशी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला ४८६ कोटी रुपये मालमत्ता कर, अद्यापही १७०० कोटींचा खड्डा  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 09:45 PM2021-03-09T21:45:34+5:302021-03-09T21:49:16+5:30

उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करावर महापालिकेची मदार आहे. मात्र पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ता करात सूट, त्यातून निर्माण झालेला गोंधळ आणि मालमत्ताधारकांना उशिरा देयके पाठविल्याने मालमत्ता कराच्या उत्पन्नात यंदा मोठी घट झाली आहे.

Property tax of Rs 486 crore deposited in Municipal Corporation treasury on last day | शेवटच्या दिवशी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला ४८६ कोटी रुपये मालमत्ता कर, अद्यापही १७०० कोटींचा खड्डा  

शेवटच्या दिवशी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला ४८६ कोटी रुपये मालमत्ता कर, अद्यापही १७०० कोटींचा खड्डा  

Next

मुंबई-  मालमत्ता कर जमा करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी एका दिवसात तब्बल ४१५ कोटी ८५ लाख रुपये महापालिकेच्या (Municipal Corporation) तिजोरीत जमा झाले आहेत. २०२०-२०२१ मध्ये पाच हजार २०० रुपये मालमत्ता कर जमा करण्याचे महापालिकेचे लक्ष्य होते. मात्र यापैकी आतापर्यंत केवळ तीन हजार ४८६ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीला सुमारे १७०० कोटी रुपयांचा खड्डा पडणार आहे. परिणामी, मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. (Property tax of Rs 486 crore deposited in Municipal Corporation treasury on last day)

उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करावर महापालिकेची मदार आहे. मात्र पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ता करात सूट, त्यातून निर्माण झालेला गोंधळ आणि मालमत्ताधारकांना उशिरा देयके पाठविल्याने मालमत्ता कराच्या उत्पन्नात यंदा मोठी घट झाली आहे. यातच, गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल २० हजार कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे महापालिकेने मोठ्या थकबाकीदारांची यादी करून कठोर कारवाई सुरु केली. त्यानुसार थकीत रक्कम न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करणे व त्याचा लिलाव केला जाणार आहे.

मुंबईकरांना दिलासा! तूर्तास लॉकडाऊन नाही, पण...; पालिका प्रशासनाने दिला असा इशारा! 

दरम्यान, थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेने ८ मार्च २०२१ पर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर थकबाकीदारांवर कारवाईचा वेग वाढविण्यात येणार आहे. आतापर्यंत थकबाकीदारांचे वीज, पाणी तोडण्याची कारवाई केली जात होती. यापुढे जप्त केलेल्या मालमत्तांच्या किंमती ठरवून लिलाव करुन पालिकेच्या थकीत कराची वसुली केली जाणार आहे. 

येथे भरू शकता मालमत्ता कर - 
महापालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपानावर नागरिकांकरिता (For Citizens) या पर्यायावर 'क्लिक' केल्यानंतर उघडणाऱ्या ‘ड्रॉपडाऊन मेनू’मध्ये 'मालमत्ता कर’, असा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायावर 'क्लिक' केल्यानंतर उघडणाऱ्या पानावर 'मालमत्ता खाते क्रमांक' (Property UID) नमूद करून संबंधित मालमत्तेवरील करांचा भरणा करता येऊ शकतो. 

वरील संकेतस्थळासह 'MyBMC 24x7' या 'अॅन्ड्रॉईड ऍप' द्वारेदेखील ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो. हे ऍप 'प्ले स्टोअर'वर मोफत उपलब्ध आहे.


 

Web Title: Property tax of Rs 486 crore deposited in Municipal Corporation treasury on last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.