Join us

राज्याच्या एकूण कोरोना चाचण्यांत अँटिजन चाचण्यांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:06 AM

आरटीपीसीआरवर अधिक भर देण्याची गरज; टास्क फाेर्समधील तज्ज्ञांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या एकूण कोरोना चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरच्या ...

आरटीपीसीआरवर अधिक भर देण्याची गरज; टास्क फाेर्समधील तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या एकूण कोरोना चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरच्या तुलनेत अँटिजन चाचण्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. सध्या होणाऱ्या कोरोना चाचण्यांत अँटिजनचे प्रमाण ५५ टक्के, तर आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ४५ टक्के आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, अँटिजन चाचण्या या बहुतांशी फाॅल्स निगेटिव्ह येतात. राज्यातील काही जिल्ह्यांतही आरटीपीसीआरच्या तुलनेत अधिक प्रमाण आरटीपीसीआर चाचण्यांचे आहे. यात पालघर ८६ टक्के, सातारा ८४ टक्के, सिंधुदुर्ग ८५ टक्के, रायगड ८३ टक्के आणि अहमदनगर ७५ टक्के असे अँटिजन चाचण्यांचे प्रमाण आहे. मात्र, मुंबईत अजूनही ६६ टक्के प्रमाण आरटीपीसीआर चाचण्यांचे आहे. मुंबईबरोबरच परभणीत ८२ टक्के चाचण्या या आरटीपीसीआरच्या केल्या जातात.

राज्यात ९ मार्च २०२० ते ७ मे २०२१ दरम्यान २८.९ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. अँटिजन चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ६ टक्के असते, तर आरटीपीसीआर चाचण्यांत ते १० टक्के असते. अँटिजन चाचण्यांत लक्षणेविरहित रुग्णांचे निदान चुकण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे अँटिजन चाचण्यांची विश्वासार्हता कमी करून अधिकाधिक भर हा आरटीपीसीआर चाचण्यांवर दिला पाहिजे, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी दिली.

* राज्य एकूण चाचण्या - प्रति लाखांमागे

महाराष्ट्र ३,४८,६१,६०८ - ३,०५,२६८

तामिळनाडू२,७५,११,४४३ - ४,०५,१७६

राजस्थान १,०५,७१,३८८ - १,५३,४३१

केरळ १,९७,०६,५८३ - ५६,६१,२८१

गुजरात २,१६,७१,१२३ - ३,४५,६३२

दिल्ली १,९०,०९,२७२ - १०,००,४८८

----------------------------------------------