Join us

एलफिन्स्टन रोडसह परळमधील पुलाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव

By admin | Published: November 14, 2016 5:42 AM

दादर येथील सेनापती बापट मार्गावर महापालिकेचा एक एकरचा भूखंड असून, या भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन खाते, पर्जन्यजल वाहिन्या खाते

मुंबई : दादर येथील सेनापती बापट मार्गावर महापालिकेचा एक एकरचा भूखंड असून, या भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन खाते, पर्जन्यजल वाहिन्या खाते व मलनि:सारण प्रचालने खाते या तिन्ही खात्यांचे निरुपयोगी साहित्य ठेवण्यात येत आहे. या सर्व निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावून हा भूखंड मोकळा करावा, जेणेकरून महापालिकेच्या इतर आवश्यक बाबींसाठी तो वापरता येईल, असे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्ग यांना जोडणारा, तसेच पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड स्थानक व मध्य रेल्वेचे परळ स्थानक यांच्यावरून जाणारा पूल सध्या दोन मार्गिकांचा आहे. हा पूल तेथील वाहतुकीला तुलनेने अपुरा असल्याने तिथे सातत्याने वाहतूक खोळंबत असते. ही बाब लक्षात घेऊन हा पूल चार मार्गिकांचा करण्याबाबत प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी रस्ते व वाहतूक विभागाला दिले आहेत. (प्रतिनिधी)