- जमीर काझीमुंबई : पोलीस दलात कार्यरत असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सन्मानचिन्ह (इनसिग्निया) मिळालेल्या अधिकारी, कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचे ओळख पत्र देण्याचा निर्णय गेल्या चार वर्षापासून कागदावरच बारगळला आहे. इतकेच नव्हे तर संबंधित पोलिस अधिकाºयांची माहितीच पोलीस मुख्यालयात अद्याप उपलब्ध झालेली नाही.महासंचालक कार्यालय त्याबाबत आता जागे झाले आहे. सन्मानचिन्ह प्राप्त असलेल्यांची माहिती पाठविण्याची सूचना राज्यातील सर्व घटक प्रमुखांना संबंधित पोलिसांची माहिती पाठविण्याची सूचना केली आहे.चार वर्षापूर्वी तत्कालिन पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पोलीस कर्मचारी वृंद परिषदेच्या ४९ व्या सभेमध्ये इनसिग्निया मिळालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना सन्मानार्थ ‘डीजी’चे स्वतंत्र ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे संबंधित अधिकाºयांना कसलेही विशेष अधिकार मिळणार नसलेतरी त्यांच्यासाठी ते संस्मरणीय असावे, हा त्यामगील उद्देश होता. मात्र मुख्यालयातील प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे त्याचे सगळ्यांनाच विस्मरण झाले.त्याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने महासंचालकांचे ओळखपत्र देण्याचा निर्णय कागदावरच राहिला आहे. संबंधित अधिकाºयांकडून त्याबाबत नाराजी व्यक्त होवू लागल्यानंतर मुख्यालयाला जाग आली आहे. त्यामुळे २०१५ पूर्वी सन्मान चिन्ह जाहीर झालेल्या अधिकारी, अंमलदारांची यादी तातडीने जमा करण्याचे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक आयुक्त, अधीक्षक व घटकप्रमुखांना आपापल्या अखत्यारित कार्यक्षेत्रातील संबंधितांची यादी बनविण्याची सूचना दिल्या आहेत. त्यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्जात पाठविलेली यादीनुसार मुख्यालयाकडून ओळख पत्र बनवून पाठविण्यात येतील.
कर्तबगार पोलिसांना डीजीचे ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव चार वर्षापासून कागदावरच !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 9:36 PM