जिमखान्याचा प्रस्ताव फेटाळला, भाजपाची शिवसेनेला मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:52 AM2018-03-01T02:52:49+5:302018-03-01T02:52:49+5:30
महापालिका अधिका-यांसाठी बांधण्यात येणाºया जिमखान्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने प्रतिष्ठेचा करीत विरोधकांच्या मदतीने स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेतला.
मुंबई : महापालिका अधिका-यांसाठी बांधण्यात येणाºया जिमखान्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने प्रतिष्ठेचा करीत विरोधकांच्या मदतीने स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेतला. मात्र, भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाला गळाला लावत शिवसेनेला स्थापत्य समितीच्या बैठकीत मात दिली. हा प्रस्ताव या बैठकीत दप्तरी दाखल करण्यात आल्याने सत्ताधाºयांची गोची झाली आहे.
महालक्ष्मी येथील केशवराव खाडे मार्गावर महापालिकेच्या अधिकाºयांसाठी ५० कोटी रुपये खर्च करून जिमखाना बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा आणि समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला होता.
अधिकाºयांसाठी जिमखाना बांधण्याऐवजी या जागेवर मुंबईच्या महापौरांसाठी निवासस्थान बांधण्याची मागणी भाजपाने केली होती. त्यामुळे शिवसेनेने यावर मतदान घेतले.
मतदानात भाजपा आणि समाजवादी अनुकूल नसताना फेरमतदान घेऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. शिवसेनेने हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेतला. मात्र, स्थापत्य समितीमध्ये हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. सपाचे गटनेते रईस शेख यांनी हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची उपसूचना मांडली. त्याला भाजपासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला.
काँग्रेस-राष्ट्रवादीने फिरवले मत-
-स्थायी समितीत भाजपाने जिमखान्याच्या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. मात्र, स्थापत्य समितीत काँग्रेस, राष्ट्रवादीने मत फिरवले.
-त्यामुळे या प्रस्तावावर घेतलेल्या मतदानात शिवसेना ८ तर भाजपाने विरोधकांच्या मदतीने १४ जणांचा पाठिंबा मिळवत ही उपसूचना मंजूर केली. परिणामी, हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला.
जिमखान्याचे काम रखडणार
-अधिकाºयांसाठी जिमखाना बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव स्थापत्य समितीमध्ये मंजूर करून घेण्यास शिवसेनेला अपयश आले.
-एकदा नामंजूर झालेला प्रस्ताव पुन्हा पटलावर तीन महिन्यांनंतरच आणता येतो. त्यामुळे अधिकाºयांच्या जिमखान्याचे काम रखडणार आहे.