मुंबई : समुद्रतटीय सुरक्षेवर भर देतानाच भविष्यात नौदलाची ताकद आणखी वाढवण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रलयाने युद्धनौका व पाणबुडय़ांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी नवीन चार युद्धनौका आणि सहा पाणबुडय़ा बनवण्याचा प्रस्ताव असल्याचे माझगाव डॉकमधील सूत्रंकडून सांगण्यात आले.
माझगाव डॉकमध्ये सध्या ब्राव्हो प्रकारातील चार तसेच कोलकाता, चेन्नई आणि कोची या पी-15 प्रकारातील युद्धनौका बनवण्यात येणार आहेत. यामध्ये आयएनएस कोलकाता युद्धनौकेचे काम पूर्ण झाले आहे, तर ब्राव्हो प्रकारातील एक युद्धनौकाही दोन वर्षात नौदलाला सुपुर्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणो स्कॉर्पेन श्रेणीतील सहा पाणबुडय़ाही या डॉकमध्ये तयार केल्या जाणार आहेत. सध्या नौदलाच्या ताफ्यात 2क्3 विविध प्रकारच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा आहेत. पण तटीय सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी नवीन युद्धनौका आणि पाणबुडय़ा बनवण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रलयाकडून तयार करण्यात आल्याचे सूत्रंनी सांगितले.
चार युद्धनौका आणि सहा पाणबुडय़ांचा हा प्रस्ताव आहे. या युद्धनौका शिवालिक श्रेणीतील तर पाणबुडय़ा स्कॉर्पेन श्रेणीतील बनवण्याचा नौदलाचा प्रयत्न आहे. सध्या ताफ्यात असलेल्या शिवालिक आणि स्कॉर्पेन श्रेणीतील ही पुढची आणि नवीन श्रेणी तयार केली जाईल. यातील चार युद्धनौका मात्र लहान आकारातील असणार आहेत. अजून या युद्धनौका आणि पाणबुडय़ांची
निविदा काढण्यात आलेली नसून
ती लवकरच जाहीर केली जाणार
आहे. (प्रतिनिधी)
सध्या नौदलाच्या ताफ्यात शिवालिक श्रेणीतील शिवालिक एफ 47, सातपुरा एफ 48 आणि सह्याद्री एफ 49 या युद्धनौका आहेत.
सध्या नौदलाच्या सात युद्धनौका आणि सहा पाणबुडय़ांचे काम माझगाव डॉककडे असतानाच या नवीन चार युद्धनौका आणि सहा पाणबुडय़ांचे काम मिळवण्याचा प्रयत्न माझगाव डॉक प्रशासनाचा आहे.
मुंबईतील माझगाव डॉक, कोलकातामधील जीआरसी कंपनी, गोवा शिपयार्ड आणि विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्डमध्ये छोटी-मोठी जहाजे आणि युद्धनौका बनवण्याचे काम केले जाते. मात्र नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा बनवण्याचे 7क् टक्के काम माझगाव डॉकमध्येच होते.