शिवशाहीकडे टाऊनशिप उभारणीसाठी प्रस्ताव

By admin | Published: November 11, 2015 02:09 AM2015-11-11T02:09:04+5:302015-11-11T02:09:04+5:30

मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जमीनमालक, विकासकांकडून निविदा मागविल्या होत्या.

Proposal for setting up a township near Shivshahi | शिवशाहीकडे टाऊनशिप उभारणीसाठी प्रस्ताव

शिवशाहीकडे टाऊनशिप उभारणीसाठी प्रस्ताव

Next

तेजस वाघमारे, मुंबई
मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जमीनमालक, विकासकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्याला ३० जणांनी प्रतिसाद दिला आहे. यामधील दोन जमीनमालकांनी एमएमआर क्षेत्राजवळ प्रत्येकी २०० एकर जागेवर टाऊनशिप उभारणीसाठी प्रस्ताव दिला आहे. ‘शिवशाही’कडून अटी मान्य झाल्यास एमएमआर क्षेत्रात परवडणारी घरे निर्माण होतील.
सर्वांना २०२२ पर्यंत घर देण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. गेल्या १० वर्षांपासून गृहउभारणीचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी एसपीपीएलने प्रयत्न सुरू केले आहेत. एसपीपीएलला शासनाकडून निधी मिळाल्याने प्रकल्पाने खासगी जमीनमालक आणि विकासकांकडून परवडणारी घरे उभारण्यासाठी निविदा मागविल्या.
यावर आलेल्या प्रस्तावांवर एसपीपीएल अधिकाऱ्यांकडून विचार सुरू आहे. जमीनमालकांनी एसपीपीएलकडे अधिक एफएसआय तसेच बांधकामाला आवश्यक परवानग्या मिळवून देण्याची अट घातली आहे.
कर्जत-केळवली रेल्वे स्टेशनजवळ २०० एकर जागेवर टाऊनशिप उभारण्याचा प्रस्ताव एका खासगी कंपनीने दिला आहे. तसेच चौक रेल्वे स्टेशनजवळही २०० एकर जागेवर टाऊनशिप उभारण्याचा प्रस्ताव एका कंपनीने सादर केला आहे. टाऊनशिप उभारण्यासाठी जमीनमालकाने ‘शिवशाही’कडे तीन एफएसआय देण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावावर ‘शिवशाही’कडून विचार सुरू आहे. ‘शिवशाही’ने हिरवा कंदील दिल्यास परवडणारी घरे निर्माण होतील, असे एसपीपीएलच्या अधिकाऱ्यांने सांगितले.

Web Title: Proposal for setting up a township near Shivshahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.