फसवणूकप्रकरणी आराेपीचा शाेध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:06 AM2021-05-22T04:06:52+5:302021-05-22T04:06:52+5:30
मुंबई : पार्टीला मोठ्या प्रमाणात माल पाहिजे असून माल मिळाल्यानंतर मालाची पूर्ण रक्कम रोख दिली जाईल, अशी बतावणी करत ...
मुंबई : पार्टीला मोठ्या प्रमाणात माल पाहिजे असून माल मिळाल्यानंतर मालाची पूर्ण रक्कम रोख दिली जाईल, अशी बतावणी करत ठगाने एका कपडे व्यावसायिकाची दीड लाख रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे; मात्र अद्यापही आराेपी पाेलिसांच्या हाती लागलेला नसून, पाेलीस अधिक तपास करत आहेत.
.........................................
२६ पोलीस निरीक्षकांना बढत्या
मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या २६ पोलीस निरीक्षकांना बढती देत सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी/ अपर उपायुक्तपदी नेमणूक देण्यात देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक माधव मोरे, सुखलाल वर्पे, सुहास कांबळे, भागवत बनसोड, विलास गंगावणे, सुनील सोहनी, जयप्रकाश भोसले आणि सुशील कांबळे यांना सहायक पोलीस आयुक्तपदी बढती देऊन मुंबईतच नेमणूक करण्यात आली आहे.
.............................