कसारा गावातील शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 08:15 PM2017-08-08T20:15:00+5:302017-08-08T20:15:09+5:30
कसारा गावतील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मंत्रालय येथे भेट घेऊन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
मुंबई, दि.8 - कसारा गावतील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मंत्रालय येथे भेट घेऊन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. यासंदर्भात कसारा गावातील गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि कसारा गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाकरता एकूण २५ शेतकऱ्यांची ८० हेक्टर जमीन जात असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. कसारा गावातील जमिनीला हेक्टरी १ कोटी ६३ लाख रुपये मोबदला मिळत असल्याचे शेतकरी म्हणाले. या प्रकल्पात मिळत असलेल्या जमिनीच्या दराबाबत गावकऱ्यांनी श्री. शिंदे यांच्याकडे समाधान व्यक्त केले. समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकरी स्वतः हून पुढे येत असल्याबद्दल श्री. शिंदे यांनी आनंद व्यक्त केला.