एक्युप्रेशर उपचाराच्या आड वेश्या व्यवसाय, मीरारोडमधील धक्कादायक प्रकार उघडीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 10:11 PM2022-03-27T22:11:09+5:302022-03-27T22:11:22+5:30

पोलीस ठाण्यात करीम आणि नोलोफरवर वेश्या व्यवसाय चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

prostitution business under Acupressure treatment in mira road | एक्युप्रेशर उपचाराच्या आड वेश्या व्यवसाय, मीरारोडमधील धक्कादायक प्रकार उघडीस

एक्युप्रेशर उपचाराच्या आड वेश्या व्यवसाय, मीरारोडमधील धक्कादायक प्रकार उघडीस

googlenewsNext

मीरारोड - मीरारोडच्या शांतिपार्क भागातील हॅप्पी होम वसाहतीत एक्युप्रेशर उपचारच्या नावाने वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोघांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना माहिती मिळाली कि , हॅप्पी होम वसाहतीत एक्युप्रेशर उपचार केंद्राच्या नावाखाली तेथे वेश्या व्यवसाय चालवला जातो. त्यांनी उमेश पाटील, विजय निलंगे, वैष्णवी यम्बर, सुप्रिया तिवले व सम्राट गावडे यांच्या पोलीस पथकासह कारवाईसाठी शुक्रवारी सापळा रचला. बनावट गिऱ्हाईकास पाठवले असता आत तीन तरुणी वेश्यागमना साठी दाखवण्यात आल्या. आत बनवलेल्या केबिन मध्ये तेथील तरुणीना वेश्या व्यवसायासाठी पाठवून मोबदल्यात पैसे घेतले जात असल्याची खात्री पटताच पथकाने छापा मारला. 

त्यावेळी पैसे स्वीकारणाऱ्या व्यवस्थापक निलोफर मुस्ताक तांबोळी (३०) रा . लक्ष्मी वैभव बिल्डीग, लक्ष्मी पार्क, मीरारोड व मुळगाव जामखेड, बीड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ३ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी रोख, मोबाईल व आक्षेपार्ह्य साहित्य जप्त केले आहे. सदर वेश्या व्यवसाय करीम सुलतानभाई कानानी (४६) रा . क्लस्टर-१, पुनम इस्टेट, मीरारोड व मुळगाव- कोरडा, ता. लिमडी , गुजरात हा चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. करीम ह्याचा क्लस्टर २ मध्ये सुद्धा एक्युप्रेशर थेरपी केंद्र असल्याचे आढळले आहे. मीरारोड पोलीस ठाण्यात करीम सह नोलोफरवर वेश्या व्यवसाय चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: prostitution business under Acupressure treatment in mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.