मुस्लीम समाजाचे आरक्षणासाठी धरणे
By Admin | Published: March 21, 2017 02:30 AM2017-03-21T02:30:56+5:302017-03-21T02:30:56+5:30
मुस्लीम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीने सोमवारी आझाद मैदानात धरणे
मुंबई : मुस्लीम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीने सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. उच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शैक्षणिक आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आवाहन संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांना केले आहे. संघर्ष समितीचे सरचिटणीस मोहसीन खान म्हणाले की, आरक्षणासाठी मुस्लीम समाजासाठी अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर मुस्लीम संरक्षण कायदा लागू करण्याची मागण्ी केली आहे. हिंदू खाटीक समाजाप्रमाणे मुस्लीम खाटीक समाजास अनुसूचित जमाती (एसटी)मध्ये आरक्षण द्यावे. गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात या मागण्या केल्या आहेत. सरकारने या मागण्यांवर गांभीर्याने विचार केला न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)