वृत्तपत्र व्यवसायातील महत्वाचा घटक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:05 AM2017-10-24T03:05:22+5:302017-10-24T03:06:05+5:30
मुंबई : वृत्तपत्र व्यवसायातील महत्वाचा घटक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण व त्यांच्या अन्य मागण्याची पूर्तता त्वरित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सोमवारी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देण्यात आले
मुंबई : वृत्तपत्र व्यवसायातील महत्वाचा घटक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण व त्यांच्या अन्य मागण्याची पूर्तता त्वरित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सोमवारी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देण्यात आले. रेल्वे स्थानक परिसरात सध्या सुरू असलेल्या फेरीवाला हटाव मोहीमेतंर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांवरही कारवाई केली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वृत्तपत्रे विक्रेता संघाच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान,याबाबत विक्रेत्यांना संरक्षण देणारा निर्णय तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
विक्रेत्यांना किमान ४ फुट बाय ४ फुटचे बाकडे आणि ऊन व पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री लावण्याची परवानगी महापालिकेने द्यावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार व संघटनेचे अध्यक्ष संजय चौकेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका आयुक्तांनी संरक्षण दिलेले १९९९ सालाचे परिपत्रक सादर केले. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न दुर्लक्षित आहे. स्टॉलची जागा मालकीची झाली नाही तरी त्या ठिकाणाहून वृत्तपत्र विक्रेत्यांची उचलबांगडी करण्यात येणार नाही अशी लेखी हमी मिळाली तरी मुंबईतील सर्व वृत्तपत्र विक्रेते आयुष्यभर आपले ऋणी राहतील, अशी भावना वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यक्त केली. शिष्टमंडळात अमोल पवार, जीवन भोसले, राजन पेंडुलकर आदी पदाधिकारी सहभागी होते.