Join us

रोशनी शिंदेंना संरक्षण द्या, कारण...; शिंदेंच्या शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 12:30 PM

ठाण्यात युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई- ठाण्यात युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  कासारवडवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  रोशनी शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गटातील महिलांनी रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 

या प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटाने पोलिसांना निवेदन दिले आहे. 'रोशनी पवार यांच्यावर शिंदे गटाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे, या संदर्भात आम्ही पोलिसांना निवेदन दिले आहे. रोशनी शिंदे संदर्भात डॉक्टरांनी अहवाल दिला आहे. त्यांना कोणतीही इटर्नल इंजुरी झालेली नाही, असा अहवाल दिला होता. त्यांना काही प्रोब्लेम नसताना आयसीयु मध्ये दाखल केले, असं शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

मोर्चात सहभागी, फेसबुक Live केलं; ठाकरेंच्या युवा रणरागिणीनं घेतला जगाचा निरोप

'हे सर्व झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना बघायला आले आणि त्यांनी तिला लिलावती रुग्णालयात दाखल केले. ज्यावेळी दोन डॉक्टरांनी क्लिनचीट दिली होती, तरीही लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रश्न आमच्या मनात आला आहे. ठाणेकर म्हणून आम्हाला आता भिती वाटत आहे, तिच्यावर जीवघेण हल्ला होऊ शकतो.  घाणेरड्या राजकारणात तिचा नाहक बळी जाऊ शकतो. म्हणून आम्ही तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

अखेर रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी एनसी दाखल

शिवसेना युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेला जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अखेर कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात बुधवारी दुपारी अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल झाला आहे. 

रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली होती. याप्रकरणी शिंदे यांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यासाठी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता.

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे