मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अंधेरीत आंदोलन छेडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत पाचजणांना अटक केली.
पोलिस हवालदार संदीप राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. रविवारी आम आदमी पार्टी पक्षाच्या अंधेरीतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केल्या. त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलिसांच्या जमावबंदी आदेशाने उल्लंघन केल्याने गुन्हा नोंदवत पाचजणांना अटक केली.
रुबेन रिचर्ड पिटर मॅस्केनेंस (वय ३५), पायास वर्गिस पुलीकोटिल (वय ५४), साजिद मुन्नवर खान (वय ३७), संदीप उत्तमलाल मेहता (वय ५७) आणि पॉल राफेल नेरेपरंबिल (वय ५२) यांना अटक करत नोटीस देऊन सोडण्यात आले. इतर अर्शद खान, वाहिद खान, प्रकाश गौर, सुमित्रा श्रीवास्तव, नीता सुकटणकर व इतरांचा शोध सुरू आहे.