Join us

आझाद मैदानात राजापुरातील रिफायनरी प्रकल्पग्रस्तांचं धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 2:39 PM

राजापूरच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला ( रिफायनरी ) कोकणातील जनतेने प्रखर विरोध केला आहे.

राजापूर - राजापूरच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला ( रिफायनरी )  कोकणातील जनतेने प्रखर विरोध केला आहे. प्रकल्पग्रस्त गावांसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आणि मुंबईतील कोकणवासीयांनी आंदोलन उभे केले आहे.  शुक्रवारी (8 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानात येथे रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर, मानवजात व जीवसृष्टी वाचवण्याच्या दृष्टीने, पॅरिस कराराचे पालन करण्यासाठी या लढ्यास अत्यंत महत्त्व आहे. 

म्हणून या आंदोलनास महाराष्ट्रातील व देशातील मान्यवरांनी व संस्था, संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला. यात पी. बी. सावंत, र. ग. कर्णिक, बंडातात्या कराडकर, बी. जी. कोळसे-पाटील, प्रवीणाबेन देसाई,  प्रा. एच. एम. देसरडा, काळूरामकाका दोधडे, प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, सुश्री मधुकांता दोशी आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे.   

टॅग्स :रत्नागिरीआंदोलन