Join us

परिचारिकेला मारहाण प्रकरणी भाभा रुग्णालयात आंदोलन, नातेवाईकांसाठी पासेस सिस्टिम, सुरक्षा वाढवणार

By संतोष आंधळे | Published: May 03, 2024 1:13 AM

नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यामधील मारहाणीच्या घटना नवीन नाहीत. मात्र या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनने अत्यावश्यक पावले उचलण्याची गरज असल्याचे या रुग्णालयातील परिचारिकांनी सांगितले.

मुंबई : डॉक्टर आणि परिचारिकांवर मारहाण करण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या स्वरूपाची घटना  कुर्ला येथील भाभा रुग्णालय बुधवारी उशीर घडली. या रुग्णालयातील महिला वॉर्डातील एका रुग्णाच्या नातेवाईकाने क्षुल्लक कारणावरून परिचारिकेच्या कानशिलात लगावली. त्यामुळे परिचारिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला असून गुरुवारी काही वेळ परिचारिकांनी काही वेळ काम करून आंदोलन केले. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यामधील मारहाणीच्या घटना नवीन नाहीत. मात्र या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनने अत्यावश्यक पावले उचलण्याची गरज असल्याचे या रुग्णालयातील परिचारिकांनी सांगितले. परिचारिकांच्या आंदोलनाची रुग्णालय प्रशासनाने  गंभीर दखल घेतली. त्या ठिकाणी यापुढे रुग्णालयात सोडताना नातेवाईकांसाठी पासेस सिस्टिम चालू करण्यात येणार आहे. तसेच रुग्णलायतील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच या स्वरूपाच्या घटना घडू नयेत म्हणून रुग्णालयातील सर्वचा आरोग्य कर्मचाऱ्याचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

बुधवारी सकाळी एका महिलेला या रुग्णालयात उपचारासाठी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळेस रुग्णाला इंजेक्शन द्यावयाचे होते. त्यामुळे तेथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांना परिचारिकेने वॉर्डच्या बाहेर जाण्यास सांगितले होते. मात्र त्याच्या या वादात त्या नातेवाईकांमधील एका १७ वर्षीय मुलीने  परिचारिकेच्या कानशिलात लगावली असल्याची माहिती रुग्णलायतील सूत्रांनी दिली.  यामुळे संपूर्ण परिचारिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.  

महापालिका प्रशासनाने या प्रकारांची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येईल. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना सोडताना यावेळी पासेस सिस्टीम करण्यात येणार आहे.  

डॉ चंद्रकांत पवार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, महापालिका उपनगरीय रुग्णालये 

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई महानगरपालिकाआंदोलन