मुंबई : जबरदस्तीने धर्मातर केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश एटीएसने धार्मिक विद्वान मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली आहे. त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, असा ठराव धार्मिक नेत्यांच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आला.
मुसफिर खाना येथे गुरुवारी झालेल्या बैठकीला धार्मिक संस्था, शहरातील विद्वान मुंबई अमन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मौलाना महमूद अहमद खान दरिया बादी, मौलाना अनिस अशरफी, मौलाना जलीस अन्सारी, मौलाना फय्याज बाकीर, हाफिज इकबाल चुनावाला, मौलाना अब्दुल जलील अन्सारी, अस्लम गाझी, फरीद शेख, डॉ सलीम खान, सरफराज आरजू . डॉ.अजीमुद्दीन, दाऊद खान, शाकीर शेख, महंमद अस्लम सय्यद, नईम शेख आदीनी मते मांडून या कारवाईचा निषेध केला.
मेरठहून जाताना अटक केलेल्या मौलाना सिद्दीकी यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने पोलीसऐवजी न्यायालयीन कोठडी दिली आहे. मात्र उत्तर प्रदेश व केंद्र सरकारने राजकीय द्वेषातून ही कारवाई केली आहे. त्यामागे उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुका, महागाई, शेतकरी आंदोलनाकडून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र निरपराध लोकांना अटक करून मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.