केदारनाथ चित्रपटास विरोध : कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:03 AM2018-12-06T06:03:00+5:302018-12-06T06:03:07+5:30

बहुचर्चित केदारनाथ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली.

 Protests against Kedarnath film: A petition in court | केदारनाथ चित्रपटास विरोध : कोर्टात याचिका

केदारनाथ चित्रपटास विरोध : कोर्टात याचिका

googlenewsNext

मुंबई : बहुचर्चित केदारनाथ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. चारधामपैकी एक पवित्र असलेल्या केदारनाथ या देवस्थानाच्या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपट कसा तयार केला जातो, असा सवाल करत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
अ‍ॅड. रमेशचंद्र मिश्रा आणि अ‍ॅड. प्रभाकर त्रिपाठी यांच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे पुन्हा परीक्षण करावे. ते होत नाही तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असू शकते. आम्ही या चित्रपटाचे परीक्षण केल्याचा दावा सीबीएफसी (द सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशन)ने केला आहे. तर, उच्च न्यायालयाने हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार असल्याने गुरुवार, म्हणजे आजच या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे.
२०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा संदर्भ या चित्रपटात देण्यात आला आहे. चित्रपटाविरोधात याआधी रुद्रप्रयागच्या जिल्हा मुख्यालयासमोर काही लोकांनी निदर्शनेही केली होती.
>सुनावणीकडे लक्ष
केदारनाथचा पोस्टर आणि टीझर अभिषेक कपूर दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून विरोध सुरू झाला आहे. भाजपाचे नेते अजेंद्र अजय यांनीही ट्विट करत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:  Protests against Kedarnath film: A petition in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.