शिक्षकांकडून 'एकच मिशन जुनी पेंशन'च्या घोषणा, शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 03:15 PM2023-03-14T15:15:00+5:302023-03-14T15:17:37+5:30

चेंबूरमधील शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.

Protests in front of Education Inspector's office, slogans of 'One Mission Juni Pension' by teachers | शिक्षकांकडून 'एकच मिशन जुनी पेंशन'च्या घोषणा, शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर निदर्शने

शिक्षकांकडून 'एकच मिशन जुनी पेंशन'च्या घोषणा, शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर निदर्शने

googlenewsNext

मुंबई : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत आज मुंबईत चेंबूर शिक्षक निरीक्षक कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी आंदोलन करत निदर्शने केली. चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.

आंदोलनात शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या अधीक्षक नीता पाटील यांच्याकडे  मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले यामध्ये निवेदनात २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व नंतर अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना तसेच २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.  मुंबई मराठी अध्यापक संघ , शिक्षक भारती अशा विविध संघटनांनी ही यामध्ये भाग घेतला आहे.

Web Title: Protests in front of Education Inspector's office, slogans of 'One Mission Juni Pension' by teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई