दिंडोशीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:47+5:302021-03-26T04:07:47+5:30
मुंबई : केंद्र सरकार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला बदनाम करत असल्याच्या निषेधार्थ दिंडोशी येथील रमेश ...
मुंबई : केंद्र सरकार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला बदनाम करत असल्याच्या निषेधार्थ दिंडोशी येथील रमेश हॉटेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे व जिल्हा निरीक्षक तजुद्दीन इनामदार यांचा मार्गदर्शनाखाली सदर निदर्शने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यावेळी म्हणाले की, विरोधी पक्षनेते हतबल झाले असून सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यामुळे हा सगळा उपद्व्याप करीत ते सर्वसाधारण लोकांशी काही देणेघेणे यांना नाही, फक्त सत्तेसाठीच हा सगळा खटाटोप आहे.
यावेळी केंद्र व विरोधी पक्षाच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दिंडोशी महिला तालुकाध्यक्ष रश्मी मोरे व तालुक्यातील सर्व मुंबई पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी सर्व फ्रटल प्रमुख उपस्थित होते.