सीमाशुल्क दलाच्या कार्याचा राष्ट्राला अभिमान-राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:03 AM2019-01-26T05:03:01+5:302019-01-26T05:03:07+5:30
अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासह पर्यावरण, वन्यजीव आणि वारसा संरक्षित करण्याचे महत्त्वाचे काम सीमाशुल्क दल करते.
Next
मुंबई : अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासह पर्यावरण, वन्यजीव आणि वारसा संरक्षित करण्याचे महत्त्वाचे काम सीमाशुल्क दल करते. वनस्पती, प्राणी, कला व प्राचीन वस्तू आदींची तस्करी रोखतानाच नकली चलन रोखण्यातही सीमाशुल्क दलाचे अधिकारी, जवान महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कार्याचा देशाला अभिमान असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी काढले. ‘इंटरनॅशनल कस्टम्स डे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कस्टम विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या वेळी त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.