Join us

'ज्या घरात जन्म झाला त्याचा अभिमान...'; सुप्रिया सुळेंचे PM मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 12:23 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

मुंबई-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'जर तुम्हाला शरद पवार यांच्या मुलीचे भले करायचे असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा, अशी घराणेशाहीवरुन मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली होता. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ' मी पार्लमेंटमध्ये मेरीटमध्ये येते, ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा अभिमान आहे. माझ्यावर घराणेशाहीचे आरोप होतात ते मला मान्य आहेत. पण पार्लमेंटचा डेटा देशासमोर आहे, असं प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं.

'अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हे दहा जन्मात होणार नाही'; पक्षातील गटबाजीच्या चर्चेला दिला पूर्णविराम

लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. यावेळी खासदार सुळेंनी पंतप्रधान मोदींच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी पार्लमेंटमध्ये मेरीटमध्ये पास होते. तिथे माझे वडील मला मार्क देत नाही, डेटा वाईज सगळं देशासमोर आहे. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आमच्यावर जे घराणेशाहीचे आरोप होतात ते मला पूर्णपणे मान्य आहेत. पार्लमेंटचे तीन टर्म झाल्यानंतर जो डेटा समोर आहे. तो माझा भाऊ किंवा वडिल देत नाही, सत्तेत भाजपच आहे. एखाद्या घरात आपला जन्म झाला यात गौर काय आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालेल चालतो. याचा आम्हाला अभिमान वाटतो, हे नक्की आमच्यासाठी सोप आहे पण आमच्यात तुलनाही होऊ शकतो. आता माझे वडील माझ्या वयात त्यांच काम मोठ होते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

'आदरणीय मोदींना माझा अभिमानच वाटला असेल. ते महिला जास्त पुढे असल्या पाहिजे अस म्हणतात. उत्तराधिकारी कशाचा असतो ही पब्लिक लाईफ आहे, हे पब्लिक ठरवते आम्ही नाही ठरवत पवार साहेबांना चव्हाण साहेबांचे उत्तराधिकारी समजतात. हे आपण नाही पब्लिक ठरवतात, असंही सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :सुप्रिया सुळेनरेंद्र मोदीशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस