‘गर्व से कहो हम हिंदू है’! मनसेचा हिंदुत्ववादी बाणा; शिवसेना भवनासमोर बॅनर झळकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 11:11 AM2021-10-15T11:11:21+5:302021-10-15T11:12:39+5:30

ज्यामध्ये एकच वाक्य ठळक शब्दात छापण्यात आलं आहे की, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ आणि मनसेच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

‘Proudly say we are Hindus’! MNS Banners were flashed in front of Shiv Sena Bhavan | ‘गर्व से कहो हम हिंदू है’! मनसेचा हिंदुत्ववादी बाणा; शिवसेना भवनासमोर बॅनर झळकावले

‘गर्व से कहो हम हिंदू है’! मनसेचा हिंदुत्ववादी बाणा; शिवसेना भवनासमोर बॅनर झळकावले

googlenewsNext
ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे प्रखर विचार आहेत ते फक्त राज ठाकरेच पुढे घेऊन जात शकतातमुंबईत विविध ठिकाणी मनसेने बॅनर्स झळकावले. शिवसेनेला डिवचण्याचा प्रकारज्यांच्यात धमक आहे तेच बोलू शकतात गर्व से कहो हम हिंदू है

मुंबई – मुख्यमंत्रिपदावरुन राज्यात शिवसेना-भाजपा(Shiv sena-BJP) यांच्यात बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. राज्यात या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. परंतु वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक सत्तेसाठी एकत्र आल्यानं विरोधकांनी वारंवार टीका केली. त्यातच शिवसेनेने भूमिका बदलल्यानंतर मनसेने(MNS) विरोधकांची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.

दसरा मेळावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यातच मनसेने मुंबईत ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशा आशयाचे मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांचे बॅनर्स झळकावले आहेत. थेट शिवसेना भवनासमोरच मनसेने हिंदुत्वाची(Hindutva) गर्जना केली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मनसेच्या वतीने सेनाभवनाच्या समोरच बॅनर लावले आहेत. ज्यामध्ये एकच वाक्य ठळक शब्दात छापण्यात आलं आहे की, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ आणि मनसेच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

याबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे प्रखर विचार आहेत ते फक्त राज ठाकरेच पुढे घेऊन जात शकतात. तसेच ज्यांच्यात धमक आहे तेच बोलू शकतात गर्व से कहो हम हिंदू है त्यामुळे आम्ही हे बॅनर लावले आहेत. हे दादरमधील प्राइम स्पोर्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी तसेच मुंबईतील इतर भागात आम्ही हे बॅनर लावले आहेत असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून ज्या शिवसेनेकडे पाहिले जाते त्या शिवसेनेने महाविकास आघाडी करून दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून सेनेचे हिंदुत्व हरवले आहे अशी टीका भाजपा करत असते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हिंदुत्वाच्या अनेक मुद्द्यावर शिवसेना ठोस भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे मनसेने हिंदुत्व आक्रमकपणे पुढे नेणार असल्याचं दाखवून देत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी २ वर्षांपूर्वीच ‘त्यांच्या पक्षाची वाटचाल आता प्रखर हिंदुत्वाच्या दिशेने सुरु असेल असे घोषित करत पक्षाचा झेंडाही भगवा केला होता. तेव्हापासून राज ठाकरे यांनी अनेकदा हिंदुत्वाचे विषय उचलून धरले. दसऱ्याच्या निमित्ताने मनसेने शिवसेना भवनासमोर ‘गर्व से कहो हम हिंदू है’,असे वाक्य असलेला बॅनर लावून हाच संदेश दिला आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Web Title: ‘Proudly say we are Hindus’! MNS Banners were flashed in front of Shiv Sena Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.