Join us

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये बायो फायर टेस्टची सुविधा उपलब्ध करा; डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 6, 2023 14:26 IST

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविडने डोके वर काढले असून पुन्हा कोविड मोठ्या प्रमाणात येऊ घातला आहे.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविडने डोके वर काढले असून पुन्हा कोविड मोठ्या प्रमाणात येऊ घातला आहे  आता संमिश्र रुग्ण असलेले कोविड रुग्ण मिळत आहे.तसेच  एच३एन ₹२ चेही ३ रूग्ण आहेत. कोविड सह एच३एन२ व इतर रेस्पिरेटरी आजाराचे रूग्ण देखिल  सापडत आहेत. आज मुंबई सारख्या शहरात महागडी बायो फायर टेस्ट आजारांचे नेमके निदान करण्यासाठी आवश्यक आहे, पण शासकीय महानगरपालिका रूग्णालयातही ही टेस्ट नाही.

अंधेरी (पूर्व) मरोळ येथील कोविड काळात आधारवड ठरलेले ३०० बेडच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये गेल्या तीन लाटेत एकूण ५८००० हून अधिक कोवीड रुग्णांवर उपचार केले होते.आता येथे ५२ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत.त्यामुळे कोविड रुग्णांवर उपचार करून योग्य निदान करण्यासाठी बायो फायर  टेस्ट आवश्यक असून त्यासाठी लागणारे मशिन घेण्यासाठी १ ते २ कोटी खर्च अपेक्षित आहे.त्यामुळे यासाठी लागणारा निधी उपलब्ध  शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी विनंती राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि शिंदे गटाचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच सेव्हन हिल्स हॉस्पिटलला ईन्फेक्शीयस डिसीज हॉस्पिटल घोषित करावे अशी मागणी त्यांनी केली.

डॉ.दीपक सावंत यांनी सेव्हन हिल्स हॉस्पिटल मधील कोविड सुविधांची आणि आयसीयू कक्षाची देखिल पाहाणी करण्यासाठी येथे भेट दिली आणि यासदर्भत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यांनी या हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडट डॉ.महारुद्र कुंभार आणि त्यांच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.बायो फायर  टेस्टला लागणारे आवश्यक  मशिन येथे उपलब्ध करून दिल्यास कोविड रूग्णांचे निदान योग्य होईल असे डॅा.कुंभार यांनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जीवनदायी योजना  सुरू केल्यास व्याधी ग्रस्ताना फायदा होईल.  कोर्ट केस सुरू असल्याने हॉस्पिटल बंद झाल्यास काय होंईल? हा प्रश्न येथील डॅाक्टर व स्टाफला सतावत आहे. याबाबत शासनाने आश्वासीत करणे आवश्यक असल्याचे असे डॅा. दीपक सावंत यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :दीपक सावंत