बोंडअळीने केलेल्या नुकसानीची भरपाई द्या - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:36 AM2017-11-21T04:36:45+5:302017-11-21T04:37:14+5:30
मुंबई : कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेतली नाही.
मुंबई : कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेतली नाही. शिवाय, कापसाचे सदोष बियाणे विकले गेल्याने शेतकºयांवर नगदी पीक गमावण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शासनाने बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पवार यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला. या दौºयात आलेले अनुभव व शेतकºयांनी केलेल्या तक्रारी त्यांनी या पत्राद्वारे सरकारला कळवल्या आहेत. राज्यात जवळपास ३८ लक्ष हेक्टर कापसाची लागवड करण्यात येत असून, या क्षेत्रापैकी सुमारे ९५ टक्के क्षेत्र बी.टी. कापसाने व्यापलेले आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे कापसात जलद जनुकीय बदलाने तयार झालेल्या बी.टी. कापसाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व कापूस पिकाला बोंड अळीपासून संरक्षण मिळाले व त्यामुळे सुरुवातीला कीटकनाशकांचा वापर कमी झाला. परंतु हळूहळू बोंड अळ्यांची प्रतिकारशक्ती वाढत गेली व त्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
>विदर्भात बेरोजगारी वाढली
विदर्भामधील उद्योगधंदे बंद पडल्याने हजारो लोक बेकार झाले आहेत. ही बाब चिंताजनक व गंभीर असून, बेरोजगार लोकांचा गैरफायदा नक्षली घेऊ शकतात; त्यामुळे विदर्भामध्ये नवे उद्योग आणण्याचे काम राज्याचे प्रमुख म्हणून तुमची आहे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.