Maratha Reservation: 'मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता तात्काळ आरक्षण द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 02:39 PM2018-07-30T14:39:55+5:302018-07-30T15:22:48+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली. मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे.
मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली. मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे. तत्पूर्वी शिवसेना आमदारांशीही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली होती. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतली. माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालचं पाहिजे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, त्यासाठी आज शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र त्यासाठी सध्या ज्या समाजांना आरक्षण मिळाले आहे, त्यांच्या आरक्षणाला काहीही करू नका. केन्द्राकडे एकदाच सर्व समावेशक असा अहवाल सर्वानुमते पाठवा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली. माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालचं पाहिजे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
* हा विषय कोर्टाच्या अखत्यारित येतो का?
* राज्यकर्त्यांची प्रवृत्ती एक तर असा विषय आल्यावर कमिटी नेमतो किंवा तो विषय कोर्टाच्या अखत्यारीत आहे असं सांगतात.
* म्हणून आमचं मत आजही तेच आहे
* सगळ्यांनी एकत्र मिळून एकमतानं निर्णय घेऊन ती शिफारस केंद्राकडे पाठवावी
* सर्व पक्षांनी विशेष अधिवेशन बोलवण्याचं मान्य केलं
* मात्र त्याआधी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहिली जाणार आहे
* पण आमची भूमिका आहे की त्या अहवालाची वाट न पाहता अधिवेशन बोलवावे
* सर्वच समाजाच्या आरक्षणाचा अहवालाबाबत शिफारस द्यावी
* मराठा समाजासोबत इतरही समाजांच्या मागण्यांचा एकत्रित विचार व्हावा
* आज सेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार
Our demand is to convene a special assembly session on #MarathaReservation issue. Our MLAs will meet the Chief Minister at 4.00 pm today: Shiv Sena chief Uddhav Thackeray pic.twitter.com/uCjRcSSHY2
— ANI (@ANI) July 30, 2018