पायाभूत सुविधांच्या कामांवर स्थानिकांना रोजगार द्या-मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:31 AM2020-06-11T06:31:10+5:302020-06-11T06:31:30+5:30
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासकामासांठी स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका. भूमिपुत्रांना रोजगार ...
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासकामासांठी स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका. भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी मंत्रालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, संजय बनसोड, मुंबई आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले. आता मुंबई महानगर परिसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. परराज्यात गेलेले मजूर परत येईपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. तसेच कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे याचाही तपशील घ्या, असेही त्यांनी सांगितले.