वडाळ्याच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयालात कोरोनाबाधितांना सुविधा उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:07+5:302021-05-10T04:07:07+5:30
खासदार राहुल शेवाळे यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वडाळ्याच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयालात कोरोनाबाधितांना सुविधा उपलब्ध करून ...
खासदार राहुल शेवाळे यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडाळ्याच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयालात कोरोनाबाधितांना सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाकडे केली.
कोविड काळात वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयात सेवेत असलेले कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्या सुविधाकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट स्था. लो. समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष नंदू राणे, उपाध्यक्ष राजेश दुबे, संजय बांदिवडेकर व पदाधिकाऱ्यांसमवेत नुकतीच वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाला भेट दिली.
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांना लसीकरणाचे सुसूत्रीकरण, व्हेंटिलेटर बेड्स, पुरेसा ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन याबाबत काळजी घेणाऱ्या अनेक मागण्यांचे निवेदन दिले.
कोरोनाच्या लाटेचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचाराचा दर्जा हा सर्वोत्तम असावा, कोविड केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे. तसेच कोविड झालेल्या गंभीर रुग्णांना पॅनलवरील रुग्णालयात परस्पर दाखल करण्याचे आदेश काढावेत, अशी मागणीही त्यांनी केली. दोन वर्षांपूर्वी मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत झालेल्या कराराविषयी कामगार अजून संभ्रमात आहेत, त्याबाबत राजीव जलोटा यांना यावेळी विचारणा करण्यात आली. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी अण्णा दुराई, डॉक्टर्स व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
..........................