Join us

लॉकडाऊनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊजार्मंत्र्यांचे महावितरणला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:21 AM

लॉकडाऊन कालावधीसाठी तातडीने अधिकारी-कर्मचाºयांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या.

मुंबई : वीज पुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. महावितरणमधील अधिकारी-कर्मचारी हे महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये अतिउत्कृष्ट कामगिरी बजावणाºया कर्मचाऱ्यांना महावितरणतर्फे योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात यावे. लॉकडाऊन कालावधीसाठी तातडीने अधिकारी-कर्मचाºयांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश उजार्मंत्री नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत.

नितीन राऊत यांनी जे निर्देश दिले आहेत; त्यामध्ये वेतनगट ३ व ४ मधील तांत्रिक / अतांत्रिक कर्मचारी व कंत्राटी कर्मचाºयांना मास्क व सॅनिटायझर खरेदीकरिता प्रत्येकी एक हजार रुपये अग्रीम अदा करण्यात यावा व ही रक्कम एप्रिल २०२० च्या वेतनामध्ये किंवा तत्पूर्वी अदा करावी. ग्राहकाशी थेट संपर्क होऊ नये याकरिता मिटर रिडींग, वीज बिल वितरण, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहिम, वीजपुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या आहेत.

अत्यंत तातडीचे असल्याशिवाय १४ एप्रिलपर्यंत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडित करू नये. सर्व अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांच्या मुख्यालयातच राहावे व आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे संपर्कात राहून अत्यावश्यक सेवेकरीता कर्मचाºयांशी समन्वय साधावा.सदर कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असल्याबाबतचे पत्र संबंधित नियंत्रण अधिकाºयांमार्फत देण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. जेणेकरून संचारबंदीच्या काळात कर्मचाºयांना अत्यावश्यक सेवेसाठी जाण्याकरिता अडथळा निर्माण होणार नाही.

कर्मचाºयांना आवश्यकतेनुसार कामावर जाणे-येणे करण्यासाठी कंपनीचे वाहन उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी त्यांच्या दुचाकी वाहनावर अत्यावश्यक सेवा, महाराष्ट्र शासन उपक्रम महावितरण असे पत्रक लावण्यात यावे. च्बाह्यस्रोत कर्मचाºयांचे वेतन ७ तारखेपूर्वी करण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सुचना दयाव्यात. तसेच उपरोक्त कालावधीत अनुपस्थितीसाठी त्यांचे वेतन कपात करू नये.

च्यंत्रचालकांनी उपकेंद्रातील त्यांच्या कामाच्या वेळा परस्पर समजूतीने ठरवाव्या व तशी माहिती नियंत्रण अधिका?्यांस द्यावी. तसेच प्रत्येक तासाला रिडींग न घेता फक्त दिवसातून दोन वेळेस रिडींग घ्यावे. जेणेकरून उपकरणांना वारंवार हाताळावे लागणार नाही. सर्व लाईन स्टाफ यांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेनुसार कामकाज करावे.

च्जे कर्मचारी बाहेर गावावरून कामाला येणे-जाणे करतात त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था कंपनीच्या विश्रामगृहामध्ये किंवा कार्यालयामध्ये करण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी.

च्कर्मचा?्यांस वीज ग्राहकाकडून मारहाण झाल्यास संबंधित कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क करावा व कर्मचा?्याला संपूर्ण सहकार्य करावे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहावितरणनितीन राऊत