Join us

खासगी रुग्णालयात डेंग्यूचे मोफत उपचार द्या

By admin | Published: November 12, 2014 1:36 AM

डेंग्यू, मलेरिया व चिकन गुनिया या रोगांनी महाराष्ट्रात थैमान घातले असून, यात शेकडोंचा बळीही गेला आह़े

मुंबई : डेंग्यू, मलेरिया व चिकन गुनिया या रोगांनी महाराष्ट्रात थैमान घातले असून, यात शेकडोंचा बळीही गेला आह़े या रोगांवरील उपचार खर्चीक असल्याने सरकारी, निम्न सरकारी व खासगी रुग्णालयात याचे मोफत उपचार उपलब्ध करावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आह़े या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होणार आह़े
नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी ही याचिका केली आह़े गेल्या पाच महिन्यांपासून हे रोग संपूर्ण राज्यात फैलावले आहेत़राज्य शासन व स्थानिक प्रशासनही या रोगांना रोखण्यात अपयशी ठरले आह़े यामुळे अल्पवयीन मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांर्पयत बहुतांश जणांना याची लागण झाली व यात शेकडोंचा बळी गेला़ याचे प्रमुख कारण म्हणजे संपूर्ण राज्यात घाण व दरुगधीचे साम्राज्य आह़े तेव्हा राज्यात महामारी घोषित करून स्वच्छता अभियान राबवावे, फवारणी करावी व या रोगांबाबत जनजागृती करावी, असेही गवळी यांचे म्हणणो आह़े
तसेच या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर नियोजित आराखडा तयार करावा, अशी मागणी करत गवळी यांनी याचिकेत मुख्य सचिव, आरोग्य सचिव व इतरांना प्रतिवादी केले आह़े
या याचिकेत गवळी यांनी नवी मुंबईतील या रोगांच्या फैलावाकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले आह़े या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी गवळी यांनी मंगळवारी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाकडे केली़ त्यावर न्यायालयाने या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केल़े (प्रतिनिधी)