जनहित याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दृष्टिहीन व्यक्तींवर उपचार करणारे डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचारी विशेष प्रशिक्षित व संवेदनशील असले पाहिजेत. त्यादृष्टीने दृष्टिहीन व्यक्तींसाठी विशेष कोरोना वॉर्ड असावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
दृष्टिहीन व्यक्तींना वावरायला सोपे जाईल, असे विशेष कोरोना वॉर्ड जिल्हा सरकारी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करावे, तसेच या लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने लस द्यावी. त्यांना संजय गांधी योजनेतून दरमहा एक हजार रुपये देण्यात येतात. ती रक्कम वाढवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अनाम-प्रेम संस्थेचे सह संस्थापक अजित कुलकर्णी यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे व ॲड. अजिंक्य उडाणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
............................................