पैसे घेऊन पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविली; ठाण्यातून तरुणाला अटक, एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:27 AM2023-12-14T09:27:16+5:302023-12-14T09:27:27+5:30

भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.

provided confidential information to Pakistan for payment; Youth arrested from Thane, ATS action | पैसे घेऊन पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविली; ठाण्यातून तरुणाला अटक, एटीएसची कारवाई

पैसे घेऊन पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविली; ठाण्यातून तरुणाला अटक, एटीएसची कारवाई

मुंबई : भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.  गौरव पाटील (२३, मूळ रा. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याने मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांची अप्रेंटिसशिप केली होती. 

ठाण्यातील एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पाटीलला ताब्यात घेत चौकशी केली. एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ मध्ये फेसबुक व व्हॉट्सॲपद्वारे पाकिस्तानातील दोन हस्तकांशी त्याची ओळख झाली होती. 

पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर

माहितीच्या बदल्यात त्याने पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेले तिघे अशा चार जणांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. तिसऱ्या व्यक्तीबाबत अधिक तपास सुरू आहे. पाटीलला अटक करण्यात आली आहे. 

डॉक यार्डमध्ये ६ महिन्यांची अप्रेंटिसशिप

गौरव याने आयटीआयचे शिक्षण घेतले. पुढे नेव्हल डॉक यार्डमध्ये त्याने ६ महिन्यांची अप्रेंटिसशिप केली होती. येथूनच त्याने महत्त्वपूपर्ण माहिती शेअर केल्याचा एटीएसला संशय आहे. तो ठाणे परिसरात भाडेतत्त्वावर एकटाच राहत होता. त्याने आतापर्यंत किती पैसे घेतले, काय काय माहिती शेअर केली?, याबाबत एटीएस अधिक तपास करत आहे. 
 

Web Title: provided confidential information to Pakistan for payment; Youth arrested from Thane, ATS action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.