मुंबई : याआधी ज्या कायमस्वरुपी विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान मिळाले होत त्यांना पुढील शैक्षणिक वषार्पासून आणखी २० टक्के असे एकूण ४० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले.यावेळी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावले. यासाठी १४५ कोटी रुपयांची तरतूद केली केली असून अशा शाळांची फाईल वित्त विभागाकडे पाठविल्याची माहिती गायकवाड यांनी देताच पवार यांनी टप्प्याटप्प्यान हे अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन दिले. कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्वावरील पात्र शाळांना आता ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली आहे. पुढील शैक्षणिक वषार्पासून उर्वरित अनुदानही त्यांना दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
विनाअनुदानित शाळांसाठी १४५ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 5:21 AM